आजवर ग्रामपंचायतीच्या राजकारणात साठेवाडीकरांवर सातत्याने अन्याय झाला, कोळगाव ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात आल्यामुळे कोळगाव बरोबरच साठेवाडीच्या विकासासाठी भविष्यात निधी मिळेल. विकास कामात साठेवाडीकरांवर अन्याय होवू देणार नाही, निवडणुक काळात दिलेला शब्द पाळला जाईल असे आश्वासन अमरसिंह पंडित यांनी दिले. विविध विकास कामांचा शुभारंभ करताना ते साठेवाडी येथे बोलत होते. यावेळी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
गेवराई तालुक्यातील मौजे कोळगाव ग्रामपंचायत अंतर्गत साठेवाडी येथील गावांतर्गत रस्ता, नाली बांधकाम व नळ पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अमरसिंह पंडित यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी पं.स.सदस्य परमेश्वर खरात, सरपंच राजेंद्र कदम, बळीराम रसाळ, संदिपान दातखीळ, ज्ञानेश्वर नवले, विष्णू पिसाळ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कोळगाव ग्रामपंचायतीतील सत्ता परिवर्तनानंतर अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली सरपंच व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी सर्व समावेशक विकास कामांना सुरुवात केली आहे. निवडणुकी दरम्यान दिलेल्या आश्वासनांची पुर्तता करण्यासाठी अमरसिंह पंडित यांच्या उपस्थितीत साठेवाडी येथे विविध विकास कामांचा शुभारंभ झाला. कार्यक्रमाला साठेवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाला चेअरमन वैजिनाथ अनभुले, जिजाभाऊ अनभुले, राजेंद्र गुजर, अजिनाथ अनभुले, आनंद अनभुले, बाळासाहेब क्षीरसागर, बाबासाहेब पवार, अभिमान धोत्रे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...