गेवराई दि १७ ( वार्ताहार ) केसुला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित रायसिना इंग्लिश स्कूल सुशी (व) या शाळेचे सातवे वार्षीक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. यावेळी चिमुकल्यांनी गणपती आराधना, माऊली माऊली, देशभक्तीपर, तसेच हिंदी, मराठी व रिमिक्स गीतांवर आपली कला सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी उपस्थितीतांनी उस्फूर्तपणे दाद देत टाळ्यांचा कडकडाट केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा ईसाचे राज्य सहसचिव निखिल वाघमारे, गेवराई ठाण्याचे सपोनि प्रफुल्ल साबळे, पोउनि तुकाराम बोडखे, पोउनि मोहन राठोड, व्हॉईस ऑफ मीडियाचे तालुकाध्यक्ष पत्रकार विनोद पौळ, किंगसन ग्लोबल स्कूलचे संचालक श्याम चाळक, मनसेचे तालुकाध्यक्ष जयदिप गोल्हार, बं.पिपळा सरपंच तुकाराम तळतकर, साईनाथ गावडे, गणेश धायतिडक सह आदी मान्यवर तसेच माता-पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते थोर महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दिप प्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. स्नेहसंमेलनास श्रीगणेश वंदनाने सुरवात झाली यानंतर माऊली माऊली, पाणी वाचवा, अंधश्रद्धा प्रबोधनपर नाटिकांसह शंकरा रे शंकरा, आई भवानी तुझ्या कृपेने सह आदी हिंदी, मराठी गीतांसह विविध सामाजिक संदेश देणाऱ्या नाटकाबरोबर बहारदार गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला. तसेच यावेळी पुलवामा घटनेतील हुतात्मांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक शाळेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.विजय राठोड यांनी तर सूत्रसंचालन प्रतीक्षा चांदेकर यांनी केले. तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शुभांगी गिरी, प्रतिभा चव्हाण, आशा पवार, प्रिया राठोड, कविता मोंढे, तुरुकमारे राहुल सर, स्वप्निल माने राजू राठोड यांनी विशेष परिश्रम घेतले.
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...