गेवराई दि १६ ( वार्ताहार ) शहरातील संजय नगर भागातील एक तरूण गोविंदवाडी तलावाजवळ असनाऱ्या एका दर्गाच्या पाया पडण्यासाठी गेला होता तसेच हातपाय धूताना त्यांचा तोल सुटला आणि तो पाण्यात पडला व त्यांचा यामध्ये दुर्दैवी अंत झाला असल्याची घटना ( दि १६ रोजी ) दूपारी तिन वाजण्याच्या सुमारास घडली
याबाबत सविस्तर माहिती अशी की , अमर अजिस शेख ( वय ३२ वर्ष ) राहणार संजय नगर गेवराई तालुका गेवराई जिल्हा बीड असे मयत तरूणांचे नाव असुन आज दूपारच्या वेळी गेवराई शहरालगत असनाऱ्या गोविंदवाडी तलावाच्या शिवारात दर्गा ला हा तरूण गेला असल्याची प्राथमिक माहिती आहे तसेच या तलावात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा आहे तसेच तोंड हातपाय धूत असतांना त्याचा तोल सुटला आणि हा युवक पाण्यात बूडाला तसेच स्थानिकांनी ही माहिती पोलिसांना दिली गेवराई पोलिस घटनास्तळावर दाखल झाले तसेच मयत तरूणांचा मृत्यूदेह पाण्यातून बाहेर काढला असुन त्याला उत्तरीय तपासणीसाठी गेवराईच्या उपजिल्हा रूग्णलायता आनले असुन या प्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असल्याची माहिती जमादार साजेत सिद्धीकी यांनी दिली आहे .
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...