पाच ऐजंन्टने मिळून भरवली बोगस गूंठेवारीची शाळा; शिक्षकांचा दिला बळी

चाळीस जणांचा बचाव करून बनावट गूंठेवारी केल्यानं एकांवर गुन्हा दाखल

गेवराई दि १६ ( वार्ताहार ) शहातील जमिनीवर खरेदी होत नाही तसेच ती जमिन प्लॉटिंग करून अफाड पैसे कमण्याच्या नादात एक शिक्षक अडकला आहे चक्क उप विभागिय अधिकारी ( महसुल ) यांच्या बनावट स्वाक्षरी आणि शिक्याचा वापर केला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे यामध्ये सर्वांनीच मलिदा लाटून एका शिक्षकांचा बळी दिला असल्याची चर्चा शहरातील उद्योगपती यांच्यामध्ये सुरू आहे .

याबाबद सविस्तर माहिती अशी की , बलभिम दगडू खोले ( वय ५४ वर्ष ) राहणार बीड असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या शिक्षकांचे नाव असुन गेवराई शहरातील चाळीस लोकांना याने फसवले आहे तसेच उपविभागीय अधिकारी यांची बनावट स्वाक्षरी व आदेश दिल्याप्रकरणी या आरोपीने स्टॅपवर शपथपत्र दिले आहे ते बेकायदेशीर आहे . तसेच हा गुन्हा बेकायदेशीर पणे दाखल करण्यात आला असल्याची माहिती आहे .

या चाळीस लोकांपैकी एकही व्यक्ती गुन्हा दाखल झालेल्या शिक्षकाला ओळखत नाही तसेच गेवराई शहातील नामाकिंत पाच खाजगी ऐजंन्ट यांनी चाळीस लोकांची गुंठेवारी करायची आहे एक लक्ष रूपये प्रतिगूंठा प्रमाणे व्यवहार ठरला तसेच बीड मधील एका सामाजिक कार्यकर्ते यांनी सदरची माहिती ही माहिती अधिकारातून उपलद्ध केली त्यानंतर प्रशासनाला जाग आली आणि उपविभागीय अधिकारी यांनी या चाळीस लोकां विरूद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले

परंतू काल ( दि १६ जानेवारी ) रोजी शासकीय विश्रामगृह परिसरातील एका खाजगी बियरबार वर या चाळीस लोकांची व पाच खाजगी ऐजंन्ट यांची बैठक झाली आणि त्यामध्ये प्रत्येकी ६० हजार रूपये मॅनजमेंन्टच्या नावाखाखाली घेऊन वरिल शिक्षकांविरूद्ध गून्हा दाखल करण्यात आहे तसेच या शिक्षकांवर दबाब टाकून यांच्याकडून शपथपत्र लिहून घेतले आहे जे बेकायदेशीर आहे वरील चाळीस लोकांना वाचवण्यासाठी हा सगळा प्रकार केला हा शिक्षक कुठेच शासकीय रेकॉर्डवर नाही दिलेल्या शपथपत्र न्यायलयात टिकणार नाही आणि यात जामिन मिळेल हा सगळा प्लॉन आहे प्रकरण शांत करण्याचा परंतू उपविभागीय अधिकारी यांच्याकडे ज्या लोकांचे अर्ज आहेत त्यांनाच या प्रकरणी आरोपी करता येईल असा कायदा सांगतो परंतू मास्टर मांईन्ट प्लानिंग करून हा सगळा विषय शांत करण्यात प्रशासन व खाजगी ऐजंन्ट सक्सेस झाले असे म्हटले देखील वावगे ठरणार नाही

अर्जदार शिक्षक नाही चाळीस लोक आहेत त्यांच्यावर कार्यवाई अपेक्षीत

या प्रकरणातील एकही व्यक्ती यांची ओळख या शिक्षकासोबत नाही परंतू गेवराईच्या पाच ऐजंन्ट मार्फत हा विषय झालेला आहे केवळ शपथपत्र देऊन प्रकरणाची दिशा वळवण्यात आली आहे तसेच बलभिम खोले हा शिक्षक प्रशासनाच्या रेकार्डवर या व्यक्तीचा साधा अर्ज देखील नाही म्हणून या गुन्ह्यात वरील चाळीस लोकांना वाचवण्यात आले आहे हे त्रिवार सत्य आहे तसेच या प्रकरणी उच्च न्यायालयात धाव घेतली जाणार असल्याची माहिती एका सामाजिक कार्यकर्त्यांनी दिली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *