January 22, 2025

वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार;गेवराई बसस्थानक परिसरातील घटना

नगर परिषदेने लावलेल्या सिसिटिव्ही बंद

गेवराई दि २९ ( वार्ताहार ) शहरातील बसस्थानक परिसरातील एका ( ७० वर्षिय ) वयवृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे तसेच ही घटना ( दि २९ रोजी ) मध्यरात्री ३ वाजण्याच्या दरम्यान घडली आहे .

याबाबद सविस्तर माहिती अशी की , बसस्थानक परिसरात एक ७० वर्षिय वयवृद्ध महिला फळ विकून आपली उपजिविका भागवते व त्याच ठिकाणी राहते याचं संधीचा फायदा घेऊन ( दि २९ ) च्या मध्यरात्री ३ वाजता एकानीच नराधमाने या वयवृद्ध महिलेवर लैगिंक अत्याचार केला आहे तसेच या पिडीतेला जबर मारहान देखिल केली आहे तसेच ही घटना बसस्थानक परिसरात घडली आहे याठिकाणी एकही सिसिटिव्ही चालू नाही हे दूर्दैव आहे पोलिस सुत्राला याबाबद विचारना केली असता आम्ही सिसिटिव्ही बंद असलेबाबद नगरपरिषदेला कळवले आहे परंतू सिसिटिव्ही बंद असल्याने नगर परिषदेचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे तसेच आरोपी अद्याप फरार असुन या पिडीतेवर गेवराईच्या उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहे तसेच पोलिस अधिकारी देखील याठिकाणी उपस्थित आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *