January 22, 2025

खोटा अहवाल सादर केल्या प्रकरणी खटला चालविण्याचे गेवराई न्यायलयाचे आदेश

तपास अधिकारी भूषण सोनार यांना हजर राहण्याबाबद समन्स जारी


गेवराई: दि. २३ ( वार्ताहार ) महाराष्ट्र पोलीस सेवेतील पोलीस उप निरीक्षक पदावर गेवराई पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असणारे तत्कालीन अधिकारी भुषण दिनकर सोनार यांनी न्यायालयीन कारवाईत चुक आणि खोटा अहवाल दाखल करुन केलेल्या गुन्ह्याबाबत, त्यांच्यावर भारतीय दंड विधानाच्या कलम १६६अ कलमानुसार खटला नोंदवून न्यायालयात हजर होण्यासाठी समन्स बजावण्याचे आदेश गेवराई येथील सन्माननीय न्यायदंडाधिकारी (प्र. व.) संजय एम. घुगे यांनी दिले आहेत 

याबाबद अधिक माहिती  अशी की, बाग पिंपळगाव येथील संदेश शिवाजीराव पोतदार यांनी गेवराई न्यायालयात अनिकेत राधेश्याम अट्टल याच्यासह मंडळ निरीक्षक श्रीरंग ठोंबरे आणि तलाठी प्रभू ज्ञानोबा येवले या आरोपींविरुध्द फौजदारी तक्रार दाखल केली. या तक्रारीत आरोपींनी परस्पर संगनमताने पोतदार कुटुंबीयांची जयप्रकाश पतसंस्थेस तारण असलेली आणि त्या विषयी तशा बोजाची नोंद ७/१२ उताऱ्यास असताना अनिकेत अट्टल याच्या नावे आणि मालकी हक्कात फेरफार मंजुर करुन गुन्हा केला. याबरोबरच हा फेरफार नोंद करण्यास मुदतीत आक्षेप अर्ज देऊनही, या आक्षेपाबाबत बाजु मांडण्याची संधी नाकारुन रविवार या सुट्टीच्या दिवशी दि. १८ डिसेंबर २०११ या मागील तारखेत हा फेरफार नोंद करुन गून्हा केल्याविषयी तक्रार केली.

संदेश पोतदार यांच्या या तक्रारी वरुन या विषयी तपास करुन अहवाल न्यायालयास सादर करण्याचे आदेश मा. न्यायालयाने गेवराई पोलिसांना दिले. मा. न्यायालयाच्या या आदेशानुसार याबाबत तपास आरोपी भुषण दिनकर सोनार याच्याकडे देण्यात आला.  आरोपी भुषण दिनकर सोनार याने या प्रकरणातील अन्य आरोपींशी संगनमत करुन चुक, खोटा आणि बनावट तपास अहवाल न्यायालयीन कारवाईत दाखल केल्याने त्यांच्याविरुद्ध संदेश पोतदार यांनी गेवराई येथील मा. न्यायालयात तक्रार दाखल केली. मा. न्यायालयाने या तक्रारी बाबत चौकशीअंती भुषण दिनकर सोनार विरुध्द खटला नोंदवून न्यायालयात हजर होण्यासाठी समज जारी करण्याचे आदेश दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *