January 22, 2025

पागंरी तांड्यावर दगडफेक पोलिस कर्मचारी जखमी;निवडणूकीला गालबोट 

गेवराई दि १८ ( वार्ताहार ) तालुक्यातील पागंरी तांडा याठिकाणी मतदान मशीन काही काळ बंद पडली होती प्रशासनाने ती पुन्हा सुरू केली परंतू याठिकाणी कर्तव्यावर असनाऱ्या पोलिस कर्मचारी यांच्यावर दगडफेक करण्यात आली असल्याची माहिती असुन उपविभागीय अधिकारी कार्यलयातील बंदोबस्तावर असनारे ए एस आय गलधर यांना दगडफेकीत गंभीर ईजा झाली असल्याची माहिती आहे.तसेच त्यांच्यावर गेवराई उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत .

याबाबद सविस्तर माहिती अशी की , तालुक्यातील ७६ ग्रामपंचायती साठी आज ( दि १८ रोजी ) मतदान प्रक्रीया पार पडली प्रशासनाच्या वतिने चोख पोलिस बंदोबस्त देण्यात आला होता परंतू पागंरी तांडयावरील बूध केंद्रात वारवार मतदानसाठी वापरण्यात येणारी मशीन बंद पडत होती अतापर्यंत याठिकाणी मतदान सुरू आहे आठ वाजण्याच्या सुमारास २९४ मतदान याठिकाणी आहे प्रशासनावर नाराजी व्यक्त करत वारवार मशीन बंद पडल्याने याठिकाणी मतदानाचा हक्क बजावण्यात विलंब होत आहे यामुळे याठिकाणच्या महिला व ग्रामस्थं यांनी बंदोबस्तावर असनाऱ्या पोलिसांवर दगडफेक केली आहे यामध्ये उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यलयातील ए एस आय गलधर हे जखमी झाले आहेत त्यांच्यावर गेवराई उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत तसेच पांगरी याठिकाणी परिस्थिती हाताळण्यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त रवाना करण्यात आला असुन वरिष्ठ उपविभागीय अधिकारी स्वप्नील राठोड हे घटना स्तळावर दाखल झाले असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *