April 19, 2025

बेताल वक्तव्यामुळे नागरिक आणि स्थानिक आमदार यांची शाब्दिक चकमक

गेवराई दि १५ ( वार्ताहार ) तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूकीची रनधूमाळी सरू झाली आहे तसेच गांवागांवात निवडणूकीचे वातावरण तापले असतांना असाच एक प्रकार समोर आला आहे भाजपाचे विद्यमान आ लक्ष्मण पवार आणि ग्रासस्थ याच्यांत चांगलीच शाब्दिक चकमक झाली व समर्थक एकमेकांना भिडले असल्याची घटना ( दि १४ रोजी ) रूई याठकाणी घडली .

याबाबद सविस्तर माहिती अशी की , ग्राम पंचायत निवडणूकीचे भाजपाचे सरपंच पदाचे उमेदवार शरद कादगे यांच्या प्रचारार्थ भाजपाचे विद्यमान आ लक्ष्मण पवार यांची सभा गावांतील हनूमान मंदिराच्या पारावर होती त्याठिकाणी भाजपाचे नेते जेडी शहा यांनी मंदिराच्या पारावर भाषणात बेताल वक्तव्य केले तसेच विरोधी गटातील सरपंच पदाचे उमेदवार कालीदास नवले यांच्या समर्थकांनी जेडी शहा याचं भाषण सुरू असतांना त्यांना विरोधी गटातील सर्मथकांनी ट्रोल करण्याचा प्रयत्न केला परंतू विद्यमान आ लक्ष्मण पवार हे व्याजपिठावरूण उठून जाब विचारण्यासाठी गेले असता त्यांची आणि विरोधी गटातील कार्यकर्ते यांची शाब्दिक चकमक झाली शरद कादगे आणि कालिदास नवले हे एकमेकांत भिडले आणि जेडी शहा यांना देखील स्थानिक कार्यकर्ते यांनी धक्काबूकी केली आहे व आमदार व गांवकरी यांच्यात झालेल्या प्रकारामुळे गेवराई तालूक्यात सकाळ पासुनच चर्चेला उधाण आले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *