January 22, 2025

वाळू साठ्याचा निलाव म्हणजे गोदापात्रात दरोडा टाकण्याची अधीकृत परवानगी

गेवराई महसुल मध्ये अली बाबा और चालीस चोर की टोळी सक्रीय


गेवराई दि १४ ( वार्ताहार ) तालुक्यात अनेक ठिकाणावर वाळू उपसा मोठ्या तेजित सुरू आहे परंतू महसुल मधील काही ठराविक स्वंयघोषीत अधिकारी गेवराई तालुक्यातील गोदापात्र म्हणजे आपली जहागिरी आहे असे समजून या वाळू उत्खननात आपले हात ओले करत आहेत शंभर ब्रास पेक्षा कमी ही वाळू साठा जप्त करायचा आणि कागदावर शेकडो ब्रासचा पंचनामा करूण यांचा निलाव करायचा आणि वाळू माफियांना गोदापात्रात दरोडा टाकण्याची अधीकृत परवानगी द्यायची यातून हजारो ब्रास वाळू उपसा करून आपला खिसा गरम करायचा धंदा सध्या जोमात सुरू आहे तसेच गेवराईच्या महसुल प्रशासनात अली बाबा और चालीस चोर की टोळी सक्रीय झाली आहे .

याबाबद सविस्तर माहिती अशी की , राक्षभूवन याठिकाणचा १२५ ब्रास वाळू साठ्याचा निलाव काही दिवसापुर्वी झाला परंतू ज्या ठिकाणी हा साठा दाखवण्यात आला तिथं मात्र एक खडा देखील वाळूचा नव्हाता परंतू महसुल मधिल एका बड्या अधिकारी यांने आपला खिसा गरम करण्यासाठी चक्क या गोदापात्रातूनच हजारो ब्रास वाळूचे उत्खनन करायला लावले तसेच केवळ चार दिवसांचा कालावधी या ठेकेदाराला देण्यात आला होता तसेच गेल्या दोन दिवसांपुर्वी रेवकी देवकी परसरातील ११५० , ब्रास वाळू साठ्याचा निलाव घेण्यात आला परंतू ज्याठिकाणी हा वाळू साठा दाखवण्यात आला त्या ठिकाणी वाळूचा एक कनही नाही परंतू हा साठा निलावाच्या सर्वोच्च बोलीत ४५लक्ष ५० हजार रुपयात गेला असल्याने अनेकजन हैरान झाले आहेत पाच हजार रूपये ब्रास पेक्षा अधिक वाळू भाव झाला आहे हे रक्कम निलाव धारक कशी काढणार ? असा प्रश्न अनेकांना पडला असेल याचं गणित देखील अगदी सोप आहे महसुल मधिल प्रमुखाचा खिसा गरम केला की ? गोदापात्रात वाळू उत्खनन करण्यासाठी केणीची छूपी परवानगी मिळते रस्ता तयार करण्यासाठी जेसीबी आणि पोकलेन ह्या सामग्री कागदावर दाखवल्या जातात मात्र रस्ता तयार करण्यासाठी दाखवली जातात परंतू हे प्रत्यक्षात वाळूच्या हायवा गाड्या भरून देण्यासाठी यांचा उपयोग केला जातो असे करून दिवसाढवळ्या गोदापात्रात दरोडा टाकला जातो म्हणुन सदर बाब जिल्हाधिकारी यांनी लक्षात घेऊन सदरचे वाळू साठे जप्त करू नयेत असे आदेश द्यावेत व यापुढे वाळू साठ्याचे निलाव देखील करू नये जेने करूण वाळू माफियांना गोदापात्रात दरोडा टाकण्याची परवानगी मिळते तसेच महसुल मधिल काही प्रमुख लोक यामध्ये इनव्हॉल असतात ते जानिपूर्वक खोटे नाटे पंचनामे तयार करूण आपले खिसे भरण्याचे फार्मुले शोधत असतात तसेच जिल्हाधिकारी यांनी या प्रकणात लक्ष घालुन गेवराई महसुल मध्ये जमा झालेली अली बाबा और चालीस चोर की टोळी चे मनसुबे उधळून लावावेत अशी मागणी सर्वसामान्यातून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *