January 22, 2025

साहेब माझी त्यात इनव्हॉलमेंन्ट आहे का ? ते तपासा

दरोड्याच्या गुन्ह्यात एका माफियांचे वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे साकडे

गेवराई दि ९ ( वार्ताहार ) तालुक्यातील गोदापात्रातून अवैध वाळू उत्खनन करूण त्याच्यां तस्करीतून अनेकजण रईस बनले आहेत तसेच वाळू उपसा आणि राजकीय आश्रय घेऊन अनेक राजकीय पुढाऱ्यांचे बगलबच्चे यामध्ये आहेत तसेच गेवराई शहरातील एक सर्वसामान्य घरातील एक कार्यकर्ता अल्पवधित कोट्याधिक्ष होतो कसा ? असा सवाल अनेकांना पडला आहे परंतू यांना रईस करण्यामागे प्रशासनाचा देखील सहभाग आहे पाच ट्रॅक्टर पळवणारे कोण ? आहेत हे प्रशासनाला माहित आहेत परंतू पोलिस दलातिल प्रमुख वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे एका माफियांने साहेब माझी त्यात इनव्हॉलमेंन्ट आहे का ? ते तपासा असे साकडे घातले असल्याची माहिती आहे .

गेवराईचे तहसिलदार सचिन खाडे यांनी केलेल्या कार्यवाईतील पाच वाहने गेवराईच्या आगारातून संरक्षाणात काढली जातात यांची माहिती पोलिस प्रशासनाला नव्हती का ? गस्त घालनारे पोलिस कुठे होते ? असा प्रश्नंही उदभवत आहे महसुल प्रशासनाचा प्रमुख एक दिवसांपुर्वी त्याठिकाणी पोलिस बंदोबस्त द्या असा पत्रव्यहार करतो आणि पोलिस साधा होमगार्ड देखील त्याठिकाणी नियुक्त करत नाहीत यामुळे पोलिस प्रशासनावर देखील संशय व्यक्त केला जातो तसेच या प्रकरणात तिन आरोपी ताब्यात घेतांना उप अधीक्षकांसमोर हे टिंग्गल टवाळी करतात ऐवढी हिंमत आली कूठून फक्त प्यादे ताब्यात घेऊन पोलिसांना काय ? साध्य करायचे आहे या गुन्ह्यात नऊ जणांचा खुला सहभाग असल्याची माहिती आहे केवळ तिन आरोपी अत्तापर्यंत या गुन्ह्यात अटक केली आहेत राजकीय वैर असनारे नेते मंडळी या गुन्ह्यात आपले हात शेकत आहेत परंतू निषक्ष पणे या प्रकरणात तपास करायला हवा पोलिस दलातिल प्रमुख वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे या गुन्हात आपले नाव घेतले जात आहे मी त्यात आहे का ? माझी त्यात इनव्हॉलमेंन्ट आहे का ? ते तपासा असे वरिष्ठ अधिकारी याकडे एकाने साकडे घातले आहे हा वरिष्ठ अधिकारी कोण ? आहे याचे पुरावे सोशलमिडीयावर काही दिवसा आगोदच व्हॉयरल झाले आहेत . तसेच बीड जिल्ह्यातील एका ठाणे प्रमुखाला वाढदिवसांच्या फक्त सुभेच्छा एक बनावट दारू माफियांने  दिल्या म्हणून त्याला निलंबित केले परंतू साहेब तूमचे फोटो सगळीकडे व्हॉयरल करनाऱ्या आणि पोलिस प्रशासनावर दबाव आणानारा कार्यकर्ता कोण ? आहे यांची पार्श्वभूमी तपासा आणि कायदा व सुवैस्थेला बाधा आणनाऱ्या लोकांना पाठीशी घालू नका त्यांना अटक करण्याचे आदेश द्या अशी मागणी जनसान्यातून होत आहे .

तपास अधिकारी पारदर्शक पण; वरिष्ठांची अडचण

या गुन्ह्यातील तपास अधिकारी संतोष जंजाळ हे पारदर्शक अधिकारी आहेत त्यांच्या तपासांत कुठलाही पक्षपात नाही परंतू सदरच्या गुन्ह्यात माफियांना अटक करण्यासंदर्भात त्यांना वरिष्ठांची अडचण येत आहे यामुळे या गुन्ह्यातील उर्वरीत आरोपी अद्याप फरार आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *