दरोड्याच्या गुन्ह्यातील तिघांना सहा दिवसांची पोलिस कोठडी
वाळू तस्करांनी आगारातून पळवले होते पाच ट्रॅक्टर
गेवराई दि ७ ( वार्ताहार ) तालुक्यातील सावरगांव गोदापात्रात अवैध वाळू उत्खनन करूण त्यांची तस्करी केली जात असल्याची माहिती गेवराईचे तहसिदार सचिन खाडे यांना मिळाली होती तसेच त्यांनी या ठिकाणी छापा मारून नऊ ट्रॅक्टर व केन्या जप्त केल्या होत्या तसेच हा मुद्देमाल गेवराई आगाराच्या निगरानित लावल्या होत्या तसेच याच ठिकाणावरूण वाळू तस्करांनी सदरचे पाच ट्रॅक्टर व केन्या पळवल्या व प्रशासनाला खुले अवाहन दिले होते या प्रकरणी उप अधीक्षक स्वप्नील राठोड यांनी तिन आरोपीच्या मुसक्या काल ( दि ६ रोजी ) आवळल्या होत्या
याबाबद सविस्तर माहिती अशी की , प्रविण राऊत राहणार गेवराई , आकाश सुतार राहनार गेवराई , जूनेद शेख राहनार माळापुरी , तालुका गेवराई जिल्हा बीड असे या तिन आरोपीची नावे असुन यांनी तहसिलदार सचिन खाडे यांनी केलेल्या पाच ट्रॅक्टर गेवराई आगारातून पळऊन घेऊन जाण्यात सहभाग होता तसेच गेवराई पोलिसांत आगारातील सुरक्षा रक्षाकांच्या तक्रारीवरूण दरोडा , आणि शासकीय कामात अडथळा या कलान्वे गुन्हा दाखल केला होता या प्रकरणी पोलिसांनी सखोल तपास करूण उप अधीक्षक स्वनील राठोड यांनी त्यांना राक्षसभूवन याठिकाणावरून अटक केली होती तसेच त्यांना ( दि ७ रोजी ) गेवराईच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते तसेच या प्रकरणी दहा दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली होती परंतू न्यायालयाने त्यांना सहा दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे अशी माहिती तपास अधिकारी संतोष जंजाळ यांनी दिली आहे .
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...