सुरक्षा रक्षकांच्या अंगावर ट्रॅक्टर घालुन पाच ट्रॅक्टर पळवले
सहा आज्ञातावर दरोड्याचा गुन्हा दाखल
गेवराई दि १ ( वार्ताहार ) तालुक्यातील सावरागांव याठिकाणी अनाधीकृत वाळू उपस्यावर तहसिलदार सचिन खाडे यांनी छापा मारला त्यांनी या कार्यवाईत तब्बल नऊ स्वराज्य व अन्य कंपनीचे ट्रॅक्टर व केन्या जप्त केल्या होत्या ही सगळी वाहने आगार प्रमुख यांच्या निगरानित नविन बसस्थानक परिसरात लावण्यात आले होते परंतू सॉर्पिओ गाडीत येऊन सहा जनणांनी अगार परिसरात असनाऱ्या सुरक्षा रक्षकांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून पाच ट्रॅक्टर पळवण्यात आले आहेत या बाबद सुरक्षा रक्षकांच्या तक्रारी वरूण गेवराई पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहिती नुसार , गेवराई नविन बसस्थानकाच्या आवारात तहसिलदार सचिन खाडे यांनी कार्यवाई केलेली जप्त वाहने लावण्यात आली होती ( दि २९ नोंहेबर) च्या मध्यरात्री दोन ते अडीच वाजे दरम्यान एक काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी बॅंगलोर बेकरी समोर ऊभा समोर होती त्या गाडीत सहा ते सात लोक होते त्यातील एका व्यक्तीने बसस्थानकात मागच्या बाजूने आतमध्ये प्रवेश केला व ट्रॅक्टर चालू केले व आम्ही त्यास विरोध केला असता ईतर लोकांनीही ट्रॅक्टर चालू केले आणि माझ्या अंगावर जिवे मारण्याच्या उद्देशाने घातले मी वेळीच पाढीमागे गेलाे म्हणून माझे प्राण वाचले असल्याची तक्रार गेवराई आगाराच्या सुरक्षा रक्षकांने दिली असुन त्यांच्या फिर्यादीवरूण गेवराई पोलिस ठाण्यात दरोडा आणि शासकीय कामात अडथळा व अन्यकलमान्वे गून्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास उपनिरीक्षक ए डी भोसले ह्या करत आहेत .