तहसिलदारांनी दखल न घेतल्याने विभागीय आयुक्ताकडे तक्रार – महेश सौंदरमल
राक्षसभुवनचे नियमबाह्य वाळू लिलाव प्रकरण
गेवराई दि १ ( वार्ताहार ) तालुक्यातील राक्षसभुवन येथील नियमबाह्यपणे करण्यात आलेल्या वाळू साठ्याचा लिलाव रद्द करण्या बाबत गेवराईच्या तहसीलदारांकडे तक्रार करूनही त्यांनी या तक्रारीची दखल न घेतल्याने आपण याबाबत औरंगाबादच्या विभागीय कार्यालयात जाऊन तक्रार केली असून याबाबत त्वरित निर्णय न झाल्यास आपण रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याची माहिती भिमशक्ती युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष महेश सौंदरमल यांनी दिली.
याबाबत विभागीय आयुक्त कार्यालयात दिलेल्या निवेदनात महेश मधुकरराव सौंदरमल यांनी म्हटले आहे की, गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन येथील वाळू साठ्याचा लिलाव दिनांक २१ नोव्हेंबर २०२२ रोजी करण्यात आला. परंतु नियमानुसार या लिलावाची जाहिरात दोन वर्तमानपत्रात प्रसिद्धीस देणे आवश्यक असताना तसे न करता नियमाची पायमल्ली करून लिलाव प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यामुळे राक्षसभुवनच्या नियमबाह्य वाळू साठ्याचा लिलाव त्वरित रद्द करून शासन नियमानुसार जाहीर प्रगटन देऊन लिलाव प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी, अशी मागणी केली. परंतु तहसीलदारांनी याची दखल न घेतल्याने आम्ही औरंगाबादला विभागीय आयुक्त कार्यालयात जाऊन याबाबत लेखी तक्रार केली. राक्षसभुवनच्या वाळू साठ्याचा नियमाची पायमल्ली करून करण्यात आलेला लिलाव रद्द न केल्यास आम्हाला रस्त्यावर उतरून लोकशाही मार्गाने आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा भिमशक्ती युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष महेश सौंदरमल यांनी दिला आहे. विभागीय उपायुक्त पराग सोनवणे यांनी निवेदन स्वीकारले. महेश सौदरमल यांच्यासोबत निवेदन देताना करण जाधव, फहाद चाऊस, शाम चव्हान, विक्की सोनवणे, गणेश कांडेकर, बाळू साळवे, प्रमोद राऊत, सचिन पवार, पंडित गाडेकर, ऋषिकेश कांडेकर, धम्मदीप वाघमारे, विक्की निकाळजे, नाना मोटे आदी उपस्थित होते.
संपादकाला धमकी वजा चितावनी देणाऱ्या आघाववर बडतर्फीची कार्यवाई करा गेवराई तहसिलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना सर्व पत्रकार संघाच्या वतिने निवेदन गेवराई...