गेवराई दि २४ ( वार्ताहार ) गेवराई तालुक्यातील सावरगांव याठिकाणी असनाऱ्या गोदापात्रात अधाकृत वाळू उपसा करूण त्यांची तस्करी केली जात असल्याची माहिती गेवराईचे तहसिलदार सचिन खाडे यांना मिळाली होती तसेच त्यांनी याठिकाणी आपल्या महसुल पथकामार्फत सापळा लाऊन या ठिकाणच्या गोदापात्रात छापा टाकला या कार्यवाईत त्यांना दहा ट्रॅक्टर , दहा केन्या आणि वाळू साठ्यावर कार्यवाई केली असल्याची माहिती आहे सदरची कार्यवाईत पोलिस प्रशासन देखील सहभागी होते .
या बाबद सविस्तर माहिती अशी की , सारगांवच्या गोदापात्रात अनेक दिवसांपासुन केनीच्या साह्याने अनाधीकृत वाळू उपसा करून त्यांची तस्करी केली जात आहे अशी माहिती गेवराई महसुलचे प्रमुख तहसिलदार सचिन खाडे यांना मिळाली होती त्यांनी ( दि २४ रोजी ) सकाळपासुनच आपल्या पथकातील कर्मचारी यांना सापळा लावण्यास सांगितले होते तसेच दूपारी चार वाजण्याच्या दरम्यान तहसिलदार सचिन खाडे हे सावरगांवच्या गोदापात्रात उतरले आणि त्याठिकाणी त्यांना मोठे घबाड मिळाले आहे दहा ट्रॅक्टर , दहा केन्या , आणि शेकडो ब्रास वाळू साठे या कार्यवाईत जप्त करण्यात आले असल्याची माहिती असुन सदरच्या सिंगम कार्यवाईमुळे वाळू माफियाचे धाबे दणानले असुन ही कार्यवाई तहसिलदार सचिन खाडे , डीबी पथक प्रमुख प्रफूल्ल साबळे , सहायक पोलिस निरीक्षक संतोष जंजाळ , मंडळ अधिकारी सानप , मंडळ अधिकारी जितू लेंडाळ , तलाठी देशमुख , तलाठी ठाकूर , यांच्यासह अन्य कर्मचारी सहभागी होते.
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...