डॉ राजेश शिंदे गेवराई उपजिल्हा रूग्णालयाचे नवे अधीक्षक
गेवराई दि २३ ( वार्ताहार ) गेवराई येथिल उपजिल्हा रूग्णालयाचा अधीक्षक पदाचा पदभार डॉ राजेश शिंदे यांनी घेतला असुन या ठिकाणी काही दिवसापुर्वी डॉ महादेव चिंचोळे यांची पदोन्नती झाल्यामुळे हे पद रिक्त होते .
याबाबद सविस्तर माहिती अशी की , गेवराई उपजिल्हा रूग्णालयात गेल्या तिन वर्षापुर्वी या ठिकाणचा पदभार डॉ राजेश शिंदे यांच्याकडे होता तसेच दोन वर्ष त्यांनी चांगल्या प्रकारची सेवा दिली मध्यतरी दोन वर्ष या ठिकाणी सक्षम अधीकारी म्हणून दोन वर्ष डॉ महादेव चिंचोळे यांनी काम पाहीले तसेच याठिकाणी प्रभारी म्हणून डॉ राजेश शिंदे यांना पुन्हा संधी मिळाली आहे ते अतिषय शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जातात तसेच याठिकाणी त्यांच्या नियुक्तीमुळे गेवराई करांंना चांगली आरोग्य सेवा मिळेल यात काही दूमत नाही तसेच रूग्णालयातील , डॉक्टर , व कर्मचारी यांच्याशी त्यांचे ऋणानूबंध आहेत यांचा फायदा गेवराई करांना होणार असुन त्यांच्या निवडीबद्दल त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे .
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...