डायबिटीज आणि किडनी मोफत तपासणीचा लाभ गरजू रुग्णांनी घ्यावा
विजयसिंह पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त स्तुत्य उपक्रम
१० हजार रुपये किंमतीच्या ३३ रक्त चाचण्या मोफत होणार

गेवराई, दि.१८ ( वार्ताहार ) ः- ग्लोबल जीन कॉर्पोरेशन व शारदा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने विजयसिंह पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त गेवराई येथे मोफत डायबिटीज व किडनी तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. दि.२२ ते २६ नोव्हेंबर या कालावधीत र.भ.अट्टल महाविद्यालय, गेवराई येथे होणाऱ्या शिबीरामध्ये सुमारे १० हजार रुपये किंमतीच्या ३३ रक्त चाचण्या मोफत करून रुग्णांचे समुपदेशन करण्यात येणार आहे, शिबीराची नोंदणी सुरु झाली असून मोबाईल क्र.९४२३७१४८४७, ९४२०४२२२२४ व ७५८८६३५११२ येथे गरजू रुग्णांनी नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत डायबिटीज व किडनी तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. ज्या रुग्णांना यापूर्वी मधुमेह किंवा मुत्रपिंडाचा आजार आहे अशा रुग्णांच्या हृदय, यकृत, मुत्रपिंड, थायरॉईड यांसह सुमारे ३३ प्रकारच्या रक्त व मुत्र चाचण्या या शिबीरामध्ये होणार आहेत. सर्व रक्त चाचण्या जागतिक दर्जाच्या पॅथॉलॉजीकल लॅबमध्ये करण्यात येणार आहेत. मधुमेहाचे शरीरातील इतर अवयवांवर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास करणारी ग्लोबल जीन कॉर्पोरेशन ही संस्था आणि शारदा प्रतिष्ठान, गेवराई या सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीराचा शुभारंभ मंगळवार, दि.२२ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता होणार असून कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते ॲड.सुभाष निकम, ग्लोबल जीन कॉर्पोरेशनचे समन्वयक डॉ.नंदकुमार पानसे, रणवीर अमरसिंह पंडित व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.