गेवराईच्या गटविकास अधिकारी रजेवर;प्रभारी चार्जसाठी रस्सीखेच
सुनिल थोरात आणि बी जी राठोड यांची नावे चर्चेत
गेवराई दि १४ ( वार्ताहार ) गेवराई तालुक्याची अर्थवाहिणी असलेल्या पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी श्रीमती कांबळे ह्या आजपासुन वैद्यकीय रजेवर गेल्या असल्याची माहिती आहे त्याच्या जागी प्रभारी चार्ज साठी रस्सीखेच सुरू झाली आहे . प्रशासनातला दांडगा अनुभव असनाऱ्या दोन अधिकारी यांची नावे गटविकास अधिकारी पदासाठी चर्चेत आहेत .
याबाबद सविस्तर माहिती अशी की , गेवराई तालुक्यातील पंचायत समितीत गटविकास अधिकारी म्हणून श्रीमती कांबळे यांनी काही महिन्यापुर्वीच पदभार स्विकारला होता तसेच याठिकाणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या अनेक गावांत विकास कामे सुरू आहेत यामध्ये घरकूल , गायगोठा , रस्ते , रोजगारहमी , यासह अनेक कामे सरू आहेत तसेच श्रीमती कांबळे ह्या ( दि १४ नोंहेबर ) पासुन वैद्यकीय रजेवर गेल्या असल्याची माहिती आहे तसेच नविन पदभार स्विकारण्यासाठी जिपचे कार्यकारी अधिकारी यांचेकडे रस्सीखेच लागली आहे आज दूपारी तिन च्या नंतर या ठिकाणी प्रभारी म्हणून कूनाला चार्च मिळतो याकडे सर्वांचे लक्ष लागले असुन या पदासाठी बालविकास प्रकल्प अधिकारी सुनिल थोरात व विस्तार अधिकारी बी जे राठोड या दोन मातब्बर व प्रशासनातील दाडंगा अभूभव असनाऱ्या अधिकारी यांची नावे चर्चेत असल्याची माहिती मिळत आहे .
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...