गेवराईच्या बायपासवर रोड रॉबरी;कुंभारवाडीत पल्सर आणि वॉशिंग मशीन पळवली 

 

गेवराई दि ७ ( वार्ताहार ) गेवराई शहरातून जाणाऱ्या बीड जालना रोडवरील हायवेवर काही आज्ञात चोरट्यांनी रोड रॉबरी केली अलल्याची घटना आज ( दि ७ रोजी ) उघडकीस आली असुन घटनास्तळी गेवराई पोलिसांनी धाव घेतली आहे तसेच या रॉबरीत मोठ्या कंन्टेनर यातील अंदाजे २०० लिटर डिझेलसह ५००० हजार रूपये नगदी यांची असा ऐवज लुटारू यांनी घेऊन गेले आहेत तसेच कुंभारवाडीत एक पल्सर आणि वाशिंग मशीन ही आज्ञात चोरट्यांनी पळवली आहे 

या बाबद पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, चेन्नई वरूण पी बी १३ बीएम ९८३१ हा कंन्टेनर गूजरात च्या दिशेने केमिकल गाडीत लोड कंन्टेनर चालले होते बीड जालना रोडवरील गेवराई बायपास जवळ काही आज्ञात चोरट्यांनी गाडीला हात दाखवला व गाडी चालक व किन्नर याला जबर मारहाण करूण गाडीत असलेले २०० लिटर डिझेल काढून घेतले तसेच ५००० रूपये काढून घेतले आहेत या प्रकरणी गेवराई पोलिस घटनेचा कसुन तपास करत आहेत लवकरच आरोपी ताब्यात घेण्यात येतील असे पोनी रविंद्र पेरगूलवार यांनी सांगितले आहे .तसेच तालुक्यातील कुंभारवीड येथील रात्री दोनच्या दरम्यान महादेव शिंदे यांची पल्सर गाडी एम एच २३ बीडी ५३८८ ही गाडी व महादेव शिंदे यांची वाशिंग मशीन आज्ञात चोरट्यांनी पळवून नेली असल्याची माहिती आहे तसेच या वेगवेळ्या घटनेत मिळून दोन अंदाजे लाखांचा मुद्देमाल लंपास केला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *