आतकरे यांच्या पतंगाची विजयाच्या दिशेने वाटचाल; शिक्षक पतसंस्थेच्या निवडणूकीची रणधूमाळी
गेवराई दि ३० ( वार्ताहार ) शिक्षक पतसंस्थेची निवडणूक येत्या ( ८ नोव्हेंबर रोजी ) होत असून. या निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार अमोल आतकरे हे पतसंस्थेच्या प्रगतीसाठी आणि शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी काम करणारे शिक्षक म्हणून सर्वांनाच परिचित आहेत त्यामुळे शिक्षक मतदार अमोल अतकरे यांना पसंती देत असून त्यांच्या पतंगाची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे.
या बाबद सविस्तर माहिती अशी की ,शिक्षण क्षेत्रामध्ये गेवराई शिक्षक पतसंस्था ही महत्त्वाची मानली जाते. या संस्थेच्या ८० कोटीच्या च्या वर उलाढाल असल्यामुळे या निवडणुकीला चांगलेच महत्त्व प्राप्त झाले आहे .मात्र सत्ता टिकविण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक एकाच नाण्याच्या दोन बाजू असून सत्ता टिकवण्यासाठी यांनी दोन वेगवेगळे पॅनल तयार करून निवडणुकीच्या आखाड्यात हे दोघेही उतरले असल्याचे शिक्षक मतदारांच्या लक्षात आल्याची चर्चा सर्वत्र होत असून. अमोल आतकरे यांनी कास्ट्राईब कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून व बापूसाहेब ससाणे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आतापर्यंत अनेक शिक्षकांना न्याय देण्याचे आणि त्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम करत असल्यामुळे शिक्षकांमध्ये अमोल अतकरे विषयी सहानुभूतीची लाट निर्माण झाली आहे. त्यामुळेच शिक्षक संस्थेची प्रगती करण्यासाठी आणि शिक्षकांना त्यांचा न्याय हक्क मिळवून देण्यासाठी अमोल आतकरे हे शिक्षक पतसंस्थेच्या निवडणुकीत उतरल्याने विरोधकांनी देखील अमोल आतकरे यांचा चांगला धसका घेतला असून त्यांच्या कामामुळे आतकरे यांची या निवडणुकीत पारडे जड दिसत आहे. त्यांनी केलेल्या कामामुळे अमोल आतकरे यांच्यावर मतदार राजा विश्वास दाखवू लागला आहे. त्यामुळे अमोल आतकरेचा पतंग विजयाच्या दिशेने या निवडणुकीत उडू लागण्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. आणि सत्ताधारी आणि विरोधक यांचे सत्ता मिळविण्यासाठी चाललेले षडयंत्र हे शिक्षक मतदार राजाच्या लक्षात आल्याने अमोल आतकरेला मतदार राजा पसंती देत आहेत.
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...