नवीन पिढी सुसंस्कारित होण्यासाठी धम्म संस्कार शिबिराची आवश्यकता – डॉ.भदंत इंदवंस्स महाथेरो


बीड दि 28 ( वार्ताहार )लहाणपणीच  बालकावर झालेले संस्कार पुढील जीवनात जगताना कायम असतात, धम्म संस्कार मुलावर व्हावेत म्हणून श्रामनेर शिबिरात बालक सुसंस्कारित होऊ शकतात. अशा शिबिरात केवळ धम्मवंदना न म्हणता धम्म समजावून घेऊन आचरण करणे अत्यंत गरजेचे आहे. त्याकरिता नवीन पिढी सुसंस्कारित होण्यासाठी धम्म संस्कार शिबिराची आवश्यकता आहे. असे डॉ. भदंत इंदवंस्स महाथेरो यांनी आपल्या धम्मदेसनेत प्रतिपादन केले.

प्रियदर्शी धम्म संस्कार शिक्षण संस्था बीडच्या वतीने 66व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन तथा भिक्खू धम्मशील यांच्या 10 व्या वर्षावास समापनानिमित्त दि. 16 /10 /2022 ते 26 /10 /2022 पर्यंत 10 दिवसाचे अंशकालीन श्रामणेर शिबीर डॉ. भदंत आनंद कौशल्यायण नगर, मौजे शिवणी,धम्म हॉलमध्ये पूज्य भिक्खु धम्मशील यांनी आयोजित केले होते. या शिबिरात बीड शहरातील व परिसरातील 70 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता, सर्वप्रथम तथागतास भिक्खु संघाच्या हस्ते पुष्प तर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. पूज्य भिक्खु संघाने त्रिशरण पंचशील दिले. समापन प्रसंगी डॉ. भदंत इंदवंस्स महाथेरो, औरंगाबाद.व पूज्य भिक्खु अनिरुद्ध थेरो, औरंगाबाद. यांची प्रमुख धम्मदेसना संपन्न झाली.

धम्मदेसनेत डॉ. भदंत इंदवंस्स पुढे म्हणाले की,धम्मतत्त्वाचे जेवढे ज्ञान प्राप्त कराल व त्यानुसार आचरण करून सुफल कर्म कराल तरच आपण जीवनात दुःखमुक्तीच्याकडे वाटचाल कराल हे तथागताच्या जीवनातील अनेक उदाहरणे देऊन उपस्थितांना समजावून सांगितले. जो शरीराने, वाणीने, मनाने चूक कार्य करतो तो मूर्ख समजावा, अशा मूर्खाची संगत करू नये. त्याने जीवनात दुःखच निर्माण होईल म्हणून सद्गुणी व्यक्तींची संगत करा अशामुळे माणसाचा ओढा पंचशीलाच्या पालनाकडे जाईल व जीवनात सुख- शांती प्राप्त होईल असे स्पष्ट केले.

या प्रसंगी पूज्य भदंत अनिरुद्ध थेरो आपल्या देसनेत म्हणाले की, धम्म ही जीवन जगण्याची कला आहे, ज्यांना जगण्याची कला अवगत होते त्याला मरणाची कला शिकता येते. जो धम्माला धारण करतो तो दुःखमुक्तीकडे जाऊ शकतो हे तथागतांच्या उपदेशाद्वारे समजावून सांगितले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात पूज्य भिक्खु धम्मशील यांनी श्रामनेर शिबिराची आवश्यकता कशी आहे हे स्पष्ट केले. कितीही अडचणी आल्या तरी इच्छा तेथे मार्ग निघतो व सर्वांच्या दानातून इच्छित ध्येय गाठता येते हे स्पष्ट केले. आजची तरुण पिढी सुसंस्कारित झाली नाही तर पुढे पुन्हा आपल्यासमोर अंधारमय जीवन राहील यांची सर्वांनी जाण ठेवून त्रिसरण पंचशील, आर्य अष्टांगिक मार्ग व 10 परमितानुसार जीवन जगणे कसे गरजेचे आहे हे सुधारण सांगितले.

बुद्ध धम्माचा स्वीकार करणारे सुभाष गायकवाड, योगेश गायकवाड व पंडित मुने यांचा व सर्व दानदात्याचा संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. शिवणी परिसरातील उपासक- उपासिकांनी, संस्थेच्या सदस्यांनी शिबिर यशस्वीते करता परिश्रम घेतले. कार्यक्रमास बीड शहरातील, शिवणी परिसरातील , पंचक्रोशीतील उपासक-उपासिका , बालक बालिका व संस्थेचे बहुसंख्य सदस्य यांची उपस्थिती होती. सरनयतयाणे कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *