बाजारात गेला अन; डाव फसला १२ मोबाईल सह चोरटा जेरबंद

दोन लाखांचा मुद्देमाल जप्त; डीबी पथकांची कामगिरी


गेवराई दि २० ( वार्ताहार ) गेवराई शहरात राहणाऱ्या एकाच्या राहत्या घरातून दोन वेगवेळे मोबाईल चोरी गेले असल्याची घटना गत महिन्यापुर्वी शहरातील सरस्वती कॉलणी गेवराई याठिकाणावरूण गेले होते सुनिल शिवाजी पंडित यांनी याबाबद गेवराई पोलिसांत तक्रार नोंदविली होती तसेच सदर तक्रारीत आज्ञात चोरट्यांनी मोबाईल चोरले असल्याचा उल्लेख होता परंतू काल बूधवार रोजी डीबी पथक गस्त करत असतांना एकजणांवर संशय आल्याने त्याला ताब्यात घेतले व चौकशी केली असता १२ वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल त्यांने चोरले असल्याची कबूली आरोपीने दिली व या कार्यवाईत दोन लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे .

याबाबद सविस्तर माहिती अशी की , आसाराम उर्फ रामा उद्धव बोंगाणे ( वय १९ वर्ष ) राहणार भगवान नगर गेवराई असे या आरोपीचे नाव असुन काल ( दि १९ बूधवार रोजी ) गेवराई शहरात आठवडी बाजारात फिरत असतांना त्यांच्या संशयीत हालचाली वरूण गस्त घालत असतांना डीबी पथकाने त्याला ताब्यात घेतले व चौकशी केली असता त्यांने वेगवेगळ्या कंपनीचे १२ एनरॉईड मोबाईल चोरले असल्याची कबूली त्यांने दिली व चोरलेले १२ मोबाईल जप्त केले तसेच यांची अंदाजे रक्कम दोन लाखं रूपये ऐवढी आहे सदरची कामगिरी उप अधीक्षक स्वप्नील राठोड , पोलिस निरीक्षक रविंद्र पेरगूलवार , यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथक प्रमुख सहा पोलिस निरीक्षक प्रफूल्ल साबळे , पोहे जायभाये , पोना नितीन राठोड , पोना संजय राठोड , पोशी विठ्ठल राठोड यांनी केली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *