गेवराई : दि १८ ( वार्ताहार ) गेल्या दोन वर्षापुर्वी गेवराई येथिल उपजिल्हा रुग्णालयात मनमानी कारभार सुरू होता त्यानंतर त्यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली त्यांनी नियुक्त झाल्यापासुन आत्तापर्यंत गेवराई च्या उपजिल्हा रूग्णालयात डॉक्टर व कर्मचारी यांना शिस्त लावली व पार्दशक कारभार याठिकाणी झाला आहे. तसेच त्यांच्या कार्याची दखल घेऊन आंदोलन लाईव्ह या नामांकित वेब पोर्टलच्या वतिने प्रशस्ती पत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आहे .
या बाबत सविस्तर माहिती अशी की, अल्प वधीच्या कार्यकाळात आंदोलन लाईव्ह हे वेब पोर्टल वाचकांना लोकप्रिय झाले आहे तसेच सन २०२२ पासुन येणाऱ्या प्रतिवर्षी एक कर्तव्यदक्ष अधीकारी यांचा सन्मान करण्याचे योजीले असुन पहिल्याच वर्षीचा बहूमान हा वैद्यकीय क्षेत्रात चांगले काम केल्याबद्दल डॉ. महादेव चिंचोळे यांना मिळाला आहे. तसेच त्यांनी अतिशय उकृष्ट प्रकारे गेवराईकरांना चांगली आरोग्य सेवा दिली आहे म्हणून त्यांना प्रशस्तीपत्र बहाल करण्यात आले आहे. यावेळी आंदोलन लाईव्ह चे संपादक अविनाश इंगावले, डॉ राजेश शिंदे, विधिज्ञ सोमेश्वर कारके, सय्यद माजेद यांची यावेळी उपस्थिती होती .
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...