डीपीआयच्या माध्यमातून महाराष्ट्रात परिवर्तन वादी विचारांची फळी निर्माण केली

संस्थापक अध्यक्ष प्रा सुकूमार कांबळे यांचे प्रतिपादन

बीड दि १४ ( वार्ताहार ) आज संंपुर्ण महाराष्ट्रात जे वातावरण सुरू आहे हे विशमतेचं प्रतिक आहे येणाऱ्या काळात याचां विचार बहूजन समाजाने करायला हवा तसेच येणाऱ्या काळात डीपीआय या पक्षाच्या माध्यमातून सतेत जाण्यासाठी स्वातंत्र निवडणूक लढवून स्वाभीमान जिवंत ठेऊ व परिवर्तन करण्यासाठी डीपीआय पक्षात अनेक परिवर्तन वादी कार्यकर्ते यांची मोठी फळी ऊभा केली आहे याचां परिनाम महाराष्ट्राच्या राजकारान होईल हे निश्चित आहे असे प्रतिपादन डीपीआयचे संस्थापक अध्यक्ष प्रा सुकूमार कांबळे यांनी केले .

बीड याठिकाणी स्मृतीशेष आत्मारामजी चांदणे यांच्या ११ व्या स्मृती दिनानिमित्त कार्यकर्ता परिसंवाद शिबीराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते,व्यासपिठावर डीपीआयचे प्रदेश अध्यक्ष अजिंक्य चांदणे , राज्य सरचिटणीस संदिपजी ठोंबरे , युवकचे कार्याध्यक्ष सुरज साठे , अण्णाभाऊ साठे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष साहितीक उत्तम पवार , प्रा चंद्रकात साळवे , प्रा रमेश लांडगे , जिल्हाध्यक्ष सुभाष लोणके , अमोल शेरकर , सुनिल पाटोळे , विधिज्ञ सोमेश्वर कारके , यांची प्रमुख उपस्थिती होती .पुढे बोलताना ते म्हणाले की समता बंधूता समानतेची शिकवन देणारा डीपीआय नावाचा पक्ष आहे यामध्ये स्वाभीमानी कार्यकर्ते काम करतात तसेच शिव , फूले , शाहू , आंबेडकर , विचारधारेवर चालनारा पक्ष म्हणजे डीपीआय चे नाव आघाडीवर आहे येत्या काळात आम्ही मातंग समाजाची तागद राज्यकर्त्या विशमता वादी पक्षाला दाखवून देऊ तसेच यापुढे डीपीआय म्हणजे दलीत चळवळीत काम करणारा तगडा पक्ष आहे यांची तागद व तूम्ही युवकांनी निर्माण केलेल्या कामाचं फळ आपल्याला लवकरच मिळणार आहे तसेच पदधिकारी यांनी आत्तापर्यंत पक्षासाठी जे योगदान दिले त्यांची किमंत कार्यकर्त्याला संविधानिक पदावर बसवून दिली जाईल समाजाचा आतार्यंत विश्वासघातच झालेला आहे म्हणून आता समाजाने कुणासोबत जायचे याची जाणिव समाजाला होऊ लागली आहे म्हणून महाराष्ट्रात डीपीआय पक्ष परिवर्तन करून सत्ता काबिज केल्या शिवाय राहणार नाही डीपीआय पक्षाला सत्तेत भागिदारी मिळाली तर महाराष्ट्राच्या वतिनं पक्षाच्या वतिनं अजिंक्य चांदणे या परिवर्तन वादी युवकाला सत्तेत जाण्याची संधी पक्ष देईल व हा युवक महाराष्ट्राचा नाही तर देश पातळीवर पक्षाचे नेतृव करेल अशी ग्वाही ही त्यांनी शेवटी दिली तसेच कार्यक्रमाचे अचूक नियोजन केल्याबद्दल जिल्हाध्यक्ष सुभाष लोणके यांचही कौतूक त्यांनी या यावेळी केले याठिकाणी डीपीआयचे बीड जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *