केवळ २८ महसूल मंडळातच मिळणार पीक विमा भरपाई अग्रीम

विमा कंपनीने केले स्पष्ट, जिल्हाधिकाऱ्यांनी काढली होती ४७ मंडळांची अधिसूचना 

 

बीड दि. १४ ( वार्ताहार ) : बीड जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात पावसात खंड पडल्याने जिल्ह्यातील ४७ महसूल मंडळात पीक विमा नुकसान भरपाईपोटी २५ % अग्रीम देण्याच्या ३ अधिसूचना बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी काढल्या होत्या. मात्र पीक विमा कंपनीने या अधिसूचनांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. या ४७ पैकी केवळ २८ महसुली मंडळातच विमा नुकसान भरपाई अग्रीम देणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

बीड जिल्हात ऑगस्ट महिन्यात पावसात मोठा खंड पडला होता. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे बीड जिल्हाधिकारी राधाविनोद शर्मा यांनी ९, १२ आणि १४ सप्टेंबर रोजी वेगवेगळ्या अधिसूचना काढून जिल्ह्यातील तब्बल ४७ महसुली मंडळांमध्ये विमा भरपाई अग्रीम वाटप करण्याचे आदेश दिले होते. पीक विमा नियमातील तरतुदीनुसार मोठे नुकसान

असेल तर जिल्हाधिकाऱ्यांना अशी अधिसूचना काढून कंपनीला निर्देश देण्याची तरतूद आहे. त्यानुसार जिल्हाधिकान्यांनी या अधिसूचना काढल्या होत्या. मात्र सुरुवातीपासूनच पीक विमा कंपनीने या अधिसूचनांना विरोध केला होता. आता मात्र पीक विमा कंपनीने जिल्ह्यातील केवळ २८ महसूल मंडळातच अग्रीम देणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

      या मंडळांनाच मिळणार लाभ

नेकनूर, पिंपळोर, लिंबागणेश, येळंबघाट, घाटसावळी, चन्हाटा (ता. बीड), धानोरा, पिंपळा, दादेगाव (ता. आष्टी ), जातेगाव, नादळनोही, चकलंवा, कोळगाव (ता. गेवराई), माजलगाव, किड्डी आडगाव, तालखेड, निवुड, मंजरथ (ता. माजलगाव) अंबाजोगाई, घाटनांदूर, उजनी (ता. अंबाजोगाई), हनुमंतपिंप्री, चिंचोळीमाळी, मस्साजोग (ता. केज), सिरसाळा, मोहा (ता. परळी), अंमळनेर, कुसळंब (ता. पाटोदा).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *