३२ लांखाच्या अपहार प्रकरणी अर्थिक गुन्हे शाखेने केली होती अटक
गेवराई दि ११ ( वार्ताहार ) शहरातील बचत गटाच्या नावाखाली गट तयार करूण अनेक महिलांच्या नावे असनारी रक्कम परस्पर हडप केल्याप्रकरणी पिता पुत्रावर गुन्हा दाखल होता तसेच आरोपी फरार होते गेवराई पोलिसांना एकही आरोपी पकडण्यात यश आले नव्हते परंतू सदरचा गुन्हा अर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता अर्थिक गुन्हे शाखेने पिता पुत्राला पुण्यातून मोठ्या शिताफितीने अटक केली होती या प्रकरणी या दोन्ही आरोपींना न्यायालयाने जामिन मंजूर केली आहे .
याबाबत सविस्तर माहिती अशी की , गेवराई शहरातील तसेच अनेककांकडून पैसे उकळले असल्यामुळे तसेच संजय नगर याठिकाणी महिला बचत गटांच्या नावाखाली महिलांची अर्थिक फसवणूक करूण सदरचे आरोपीनी पलायन केले होते त्यानंतर गेवराई पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता सदरच्या गुन्ह्याचा तपास अर्थिक गून्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्यानंतर शेख आब्बास शेख महेबूब ( वय ४५ वर्ष ) व शेख आवेझ शेख आबास ( वय १९ वर्ष ) दोन्ही राहणार गेवराई असे या दोन आरोपी असलेल्या पितापूत्रांची नावे आहेत या दोघांना अर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुण्यातून अटक केली होती तसेच या प्रकरणी आनखी एक आरोपी असलेली महिला फरारच आहे .त्यांना गेवराई येथील न्यायमुर्ती घूग्गे यांच्या न्यायालयात हजर केले होते तसेच या दोघांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती तसेच तपासांत पैसे काढून घेतल्याची मशीन देखील जप्त करण्यात आली असल्याची माहिती अर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक भारत बरडे यांनी न्यायालयाला दिली व सरकार पक्षाच्या वतिने तपासकामी आणखी पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली होती तसेच आरोपीच्या वतिने विधिज्ञ सय्यद आसिमा पटेल यांनी युक्तीवाद केला व जामिन अर्जावर आदेश पारीत करण्याची विनंती केली तसेच त्यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून या दोन्ही आरोपींना गेवराईच्या प्रथम न्यायदंडाधिकारी , न्यायमुर्ती घूग्गे यांनी २५ ००० हजार रूपये जामिन अर्ज मंजूर केला आहे .
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...