चोरट्यांचा कहर कायम; आत्तातर डीपीच चोरली

गेवराई दि ३ ( वार्ताहार ) तालुक्यात चोरट्यांनी अकरक्ष: घुमाकूळ घातला आहे गेवराई तालुक्यातील गेवराई , चकलांबा , तलवाडा परिसरात चोरट्यांचे चोरीचे सत्र थांबता थांबेनासे झाले आहे आत्तातर यांनी कहरच केला आहे चक्क गावांतील विजपुरवठा करणारी डीपीच आज्ञात चोरट्यांनी चोरली असल्याची घटना ( दि ३ रोजी ) तालुक्यातील खर्डा वाडी याठिकाणी घडली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की ,गेवराई तालुक्यातील खर्डावाडी येथील सिंगल फेज ची रात्री दिड वाजण्याच्या दरम्यान आज्ञात चोरट्यांनी चोरली असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असल्याने खळबळ उडाली आहे याठिकाणी संपुर्ण गाव चोरट्यांच्या दहशतीखाली आहे तसेच या प्रकरणी तपासांची चक्रे जलद गतीने फिरवून आरोपी ताब्यात घेऊ अशी प्रतिक्रीया तलावाडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रताप नवघरे यांनी दिली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *