April 19, 2025

गंडा घालणाऱ्या पिता पुत्राला पाच दिवसांची पोलिस कोठडी

गेवराई दि १ ( वार्ताहार ) शहरातील अनेक नागरिकांना गंडा घातल्या प्रकरणी गेवराई पोलिसांत गुन्हा दाखल असलेल्या पिता पुत्राला( दि ३० रोजी ) बीडच्या अर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुणे याठिकाणी बेड्या ठोकल्या होत्या याच प्रकणात संबंधीत पिता पुत्राला गेवराईच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते त्यांना ६ तारखेपर्यंत म्हणजे पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे .

याबाबत सविस्तर माहिती अशी की , शेख आबास शेख महेबूब , आवेझ आबास दोघे राहणार संजय नगर गेवराई असे या दोन आरोपीची नावे आहेत ( दि २८ डिंसेबर ) २०२१ रोजी या प्रकरणी गेवराई पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता तसेच या प्रकरणी गेवराई पोलिसांना या आरोपी पकडण्यात यश आले नव्हते सदरचा गुन्हा हा अर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता यामध्ये ३५ लाखं रूपये वेगवेळ्या लोकांच्या नावे असलेली रक्कम परस्पर काढून घेतली असल्याचा आरोप होता सदरचे संबंधीत आरोपी अद्याप फरार होते त्यांना अर्थिक गुन्हे शाखेने अटक केल्यानंतर आज ( दि १ रोजी ) गेवराई येथील न्यायमुर्ती घूग्गे यांच्या न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते तसेच अर्थिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक बर्डे यांनी सात दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली होती त्यानंतर सरकार पक्षाच्या वतिनं विधिज्ञ ताडेवाड यांनी बाजू मांडली त्यानंतर न्यायालयाने दोन्ही आरोपीना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे दरम्यान आरोपी ला बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती व चोख पोलिस बंदोबस्तात या दोन्ही आरोपीना न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *