January 22, 2025

जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत कु.आर्या गणेश सानप हीने मिळवले गोल्ड मेडल

गेवराई : दि २८ ( वार्ताहार ) संत भगवान बाबा प्रतिष्ठान,बीड येथे जिल्हास्तरीय अजिंक्यपद युनिफाईड कराटे स्पर्धा घेण्यात आल्या. जिल्हास्तरीय स्पर्धेत गेवराई येथील कु.आर्या गणेश सानप हीने 25 ते 30 किलो वयोगटात गोल्ड मेडल मिळवले तर मुलांमधून 25 ते 30 वयोगटात चि.आटपाडकर सूर्यकांत कमलाकर याने सिल्व्हर मेडल मिळवले आहे. या यशाबद्दल कु. आर्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

बीड येथे जिल्हास्तरीय अजिंक्यपद युनिफाईड कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत 10,14,17, आणि 19 या वयोगटातील खेळाडूंचा समावेश होता. त्या मध्ये बीड मधील 130 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी असोसिएशनचे लीगल अॅडवायझर अॅड. संतोष घोलप, महाराष्ट्र इंग्लिश स्कूलचे संचालक आगाम, बीड जिल्हा सचिव युनिफाईट वेलफेअर कराटे असोसिएशन ॲड. नितीन पवार, बीड जिल्हा उपाध्यक्ष आरती सतकर, स्पर्धेचे आयोजक सुधीर अपरे उपस्थित होते. जिल्हास्तरीय स्पर्धेत गेवराई येथील कु.आर्या गणेश सानप हीने 25 ते 30 किलो वयोगटात गोल्ड मेडल मिळवले तिला प्रशिक्षक अमित कानडे यांचे मार्गदर्शन मिळाले असून स्पर्धेमधील प्रथम, द्वितीय आणि तृतीय पदक प्राप्त खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सातारा येथे निवड झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *