January 22, 2025

क्लासवन अधिकारी फोनवरच घेऊ लागले आढावा

तिन वर्षाचा मुलगा अद्याप मिळाला नाही; जिल्हाधीकारी यांनी लक्ष घालण्याची गरज

गेवराई दि २७ ( वार्ताहार ) गेवराई शहरातील रंगार चौक याठिकाणी असनाऱ्या मोठ्या नालीत एक तिन वर्षीय लहान मुलगा बूडुन वाहून गेला परंतू या घटनेला चोविस तासं लोटले असुन देखील स्थानिक प्रशासनाला अद्यापर्यंत या मुलाला शोधण्यात यश आले नाही काही दिवसांपुर्वीच माजलगावच्या धरणात डॉ फपाळ यांचा मृत्यू झाला व एक जवानाचाही दुर्दैवी मृत्यू झाला होता त्यावेळी स्वत: जिल्हाधीकारी राधा बिनोद शर्मा यांनी स्पॉटवर जाऊन यत्रंना हातात घेतली होती या प्रकरणी देखील त्यांनी येवून घटनास्तळाची पहाणी करावी व अनूभवी टीम यासाठी नियुक्त करावी अशी अपेक्षा आहे .

या बाबत सविस्तर माहिती अशी की , काल ( दि २६ रोजी ) गेवराई शहरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला या पावसांत गेवराई शहरातील रंगार चौक याठिकाणी आपल्या घरी जाण्यासाठी नाली ओलांडत असतांना बंन्टी ज्ञानेश्वर क्षीरसागर या तिन वर्षाचा मुलगा नालीत बूडाला ती नाली मोठी असुन विद्रूपा नदीला जाऊन मिळते त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात गवत आहे अद्याप पर्यंत तो सापडलेला नाही स्थानिक नगर पालिका प्रशासनाच्या निर्लज्ज कारभारामुळे या तिन वर्षीय मुलाचा बळी गेला असल्याची चर्चा नागिरात आहे बाजूला असलेल्या विद्रूपा नदीची अद्याप पर्यंत स्वच्छता करण्यात आली नाही यामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ आहे काल पासुन शोध मोहीमेत एक जेसीबी आणि मोजकीच यंत्रणा आहे क्लासवन अधिकारी यांनी फक्त घटनास्तळवर फक्त औपचारीक्ता म्हणून भेटी दिल्या आहेत . ते फक्त फोनवरूनच आढावा घेऊ लागले आहेत म्हणून या संदर्भात जिल्हा अधीकारी यांनी लक्ष घालणे गरजेचे आहे व त्यांनी याठिकाणी स्पॉटवर येण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *