गेवराई दि २७ ( वार्ताहार ) तालुक्यातील शिंदेवाडी या ठिकाणी सावकारकीच्या पैश्यातून एका महिलेला जबर मारहान झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर या प्रकरणी गेवराई पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
याबाबत सविस्तर माहिती अशी की , शिंदेवाडी याठिकाणी तक्रारदार महिलेकडे व्याजाने दिलेले १५ , ००० हजार रूपये होते व्याजाची रक्कम सह २१ , ००० हजार रूपये ऐवढी झाली होती परंतू ते पैसे आरोपीच्या मुलीचे होते परस्पर फिर्यादीकडे जाऊन वरिल रक्कम आरोपीने वसुल केली तसेच परत दोन दिवसांनी आरोपीची पत्नी व आरोपी फिर्यादीच्या घरी जाऊन पैश्याचा तगादा लाऊ लागले फिर्यादीने परवाच तूमचे सगळे पैसे मी दिले आहेत आत्ता कशाचे पैसे असे सांगितल्यानंतर आरोपीने पैसे दिले नाहीतर मी तुझ्या दारात औषध पिऊन आत्महत्या करीन अशी धमकी दिली तसेच फिर्यादीने हा सगळा विषय आरोपीच्या नातेवाईक यांना सांगितला व आरोपीने त्याच ठिकाणी तुम्ही माझी बदनामी करता का असे म्हणून फिर्यादीस लाकडाने मारहान करून तिचा हात फॅक्चर केला व जातिवाचक बोलून हाकलून दिले असल्याची फिर्याद गेवराई पोलिसांत दाखल केली असून या प्रकरणी आबा दादा मदने यांच्या विरूद्ध गेवराई पोलिसांत अनूसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायदा व अन्य कलामन्वे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उप अधीक्षक स्वप्नील राठोड हे करत आहेत .
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...