बनावट कागदपत्रे तयार करूण पिक विमा उचलला; एकाविरूद्ध फसवणूकीचा गुन्हा
गेवराई दि २३ ( वार्ताहार ) तालुक्यातील मादळमोही शिवारात असनाऱ्या एका शेतकऱ्यांचे नावे असलेली जमिन याचे बनावट कागदपत्रे तयार करूण सोयाबिन खरीपचा पिक विमा भरला व स्वत:चे खाते त्याला जोडून रक्कम उचलली असल्याची धक्कादायक घटना समोर आली असुन या प्रकरणी एकाविरूद्ध गेवराई पोलिसांत फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
याबाबत सविस्तर माहिती अशी की ,अनिरूद्ध सोमेश्वर मोहे राहनार मादळमोही यांच्या नावे गट क्रंमाक ६४१ व ८ मध्ये जमिन आहे या जमिनीच्या संर्दभात आरोपीने बनावट कागदपत्रे तयार करून २०२२चा खरीपाचा सोयाबिनचा पिक विमा भरला व सीएससी प्रणालीमध्ये आरोपीने सवत:चा बँकेचा खाते क्रंमाक टाकून ७५६० रूपये शेतकरी यांच्या परस्पर उचलला आहे सदरची बाब शेतकरी यांच्या लक्षात येताच त्याने याबाबत गेवराई पोलिसांत धाव घेतली या प्रकरणी अण्णासाहेब तुकाराम गव्हाणे यांच्या विरूद्ध गुरनं ४८९/ २०२२ कलम ४२० , ४६५ ,४६८ ,४७१ , नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक संदिप काळे करत आहेत .
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...