घरोघरी जाऊन जनावरांचे लसीकरण करण्याची मागणी

 

गेवराई दि २२ ( वार्ताहार )  गेवराई तालुक्यात व शहरात मोठ्या प्रमाणावर दुग्ध व्यवसाय करणारे पशुधनमालक असुन हजारो जनावरांच्या माध्यमातून दररोज दुध व्यवसाय केला जात आहे.सध्या सर्वत्र लंपी हा आजार जनावरांना लागण होऊ लागला आहे.या आजारावर आता प्रशासनाने जनावरांना लसीकरण करण्यास देखील सुरुवात केली आहे.हि लसीकरण मोहीम गेवराई शहरात व तालुक्यातील प्रत्येक गावातील पशुधन मालकांच्या घरोघरी जाऊन जनावरांचे लसीकरण करण्यात यावे अशी मागणी गेवराई तालुका गवळी समाज संघटनेने प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

गेवराई तहसील,पंचायत समिती व पशुवैद्यकीय दवाखाना यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की,गेवराई तालुक्यात व शहरात मोठ्या प्रमाणावर दुध व्यवसाय पशुधन मालक करत आहे.सध्या सर्वत्र लंपी हा आजार व साथ जनावरांना लागण होऊ लागल्याने पशुधन मालक चिंताग्रस्त झाले आहेत.शासनाने सध्या ठिकठिकाणी जनावरांचे लसीकरण करण्याची मोहीम हाथी घेतली आहे.या अनुषंगाने गेवराई तालुका प्रशासनाने व विशेषता पशुवैद्यकीय दवाखाना या विभागाने गेवराई शहरातील व तालुक्यातील प्रत्येक गावातील घरोघरी जाऊन जनावरांचे लसीकरण करण्याची मागणी केली आहे.शिवाय लंपी या साथ रोगाने जनावरांना ग्रासण्या अगोदरच तत्काळ प्रशासनाने पाऊले उचलून हि लसीकरण मोहिम गेवराईत सुरु करण्याचे देखील या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. प्रशासनाला निवेदन देता वेळी गवळी समाज संघटनेचे गेवराई तालुकाध्यक्ष अंगद परळकर,गोकूळ परळकर,दिपक हादगुले,महालिंग परळकर,बाबा अवदुत,कृष्णा झारकंडे,कुंदन हादगुले,मनोज हादगुले,भैय्या डोळझापे सह अनेक पशुधन मालकांच्या निवेदनात स्वाक्ष-या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *