जालना दि २० ( वार्ताहार ) बीडचे तत्कालीन डीवायएसपी सुधीर खिरडकर यांच्याविरुद्ध परीक्षेत डमी उमेदवार बसवल्याप्रकरणी अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फेब्रुवारी २०२० साली झालेल्या एलएलबी परीक्षेत सुधीर खिरडकर, यांनी डमी उमेदवार म्हणून पोलिस शिपायास बसवल्याची तक्रार करण्यात आली होती. या तक्रारी वरून डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या चौकशी समितीने तात्कालिन डीवायएसपी आणि डमी उमेदवार पोलिस शिपायास दोषी ठरवलं होतं. दरम्यान विद्यापीठाचे परीक्षा विभाग प्रमुख गणेश मांझा यांनी रात्री उशिरा दिलेल्या फिर्यादीवरून जालना पोलिस ठाण्यात डीवायएसपी खिरडकर आणि एका पोलिस शिपाया विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याने पोलिस प्रशासनात खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की ,विद्यापीठांने घेतलेल्या विधी अर्थात एलएलबी परीक्षा ऑक्टोबर आणि नोव्हेंम्बर २०१९ मध्ये पार पडली होती. यावेळी जालना येथे कर्तव्यावर असतांना तत्कालीन डीवायएसपी सुधीर खिरडकर यांनी जालना शहरातील फुले महिला महाविद्यालयात लॉ च्या प्रथम वर्षाची परीक्षा दिली होती. मात्र या परीक्षेला त्यांनी स्वतः न बसता आपल्या अधिकारांचा गैरवापर करत चक्क डमी उमेदवाराला परीक्षेला बसवलं होते. विशेष म्हणजे डमी उमेदवार म्हणून त्यांनी आपल्याच एका पोलिस कॉन्स्टेबलची निवड केली होती.
रीमा खरात- काळे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर विद्यापीठाने व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ विलास खंदारे यांच्या चौकशी समिती नेमली. या समितीने ९ मे २०२२ रोजी आपला चौकशी अहवाल विद्यापीठास सादर केला. ज्यात त्यांनी तत्कालीन डीवायएसपी तथा सध्या लातूर पोलीस प्रशिक्षण केंद्रात उपप्राचार्य असलेल्या सुधीर खिरडकर आणि डमी उमेदवार सोमनाथ मंडलिक यांना दोषी ठरवल. सदर प्रकरणात चौकशी समीतीने चौकशी केली असता, चौकशीअंती सुधीर खिरडकर २०२० यांनी दिनांक ४ फेब्रुवारी २०२० ते दिनांक दरम्यान विधी शाखेच्या पदवीचे एकून ०५ पेपर दिलेले आहेत. या सर्व उत्तरपत्रीकांवरील परीक्षार्थीची स्वाक्षरी, तपासण्यात आल्या आहेत .तर २० ऑक्टोबर २०२१ रोजी सुधीर अशोक खिरडकर यांनी चौकशी समिती समोर लिहून दिलेल्या दोन परिच्छेदातील हस्ताक्षर हे ४ फेब्रुवारी २०२० व दिनांक ५ फेब्रुवारी २०२० च्या मुळ उत्तरपत्रीकेतील हस्ताक्षराशी जुळत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तर पोलिस हवालदार सोमनाथ सहदेव मंडलीक यांनी चौकशी समिती समोर लिहून दिलेल्या दोन परिच्छेदातील हस्ताक्षर हे ४ फेब्रुवारी २०२० व दिनांक ५ फेब्रुवारी च्या मुळ उत्तरपत्रीकेतील हस्ताक्षराशी मिळते जुळते दिसुन आल्याने, सुधीर अशोक खिरडकर यांचे पेपर सोमनाथ सहदेव मंडलीक यांनी दिल्याचे स्पष्ट होत असल्याचे चौकशी समितीच्या अहवालात नमुद करण्यात आले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा वर्तुळातील ही कुणकुण लागली होती पत्रकावरील परीक्षार्थीची मुळ स्कॅन केलेली स्वाक्षरी आणि परीक्षार्थीने प्रत्यक्ष परीक्षा हॉलमध्ये परीक्षार्थीने उत्तरपत्रीके वर आणि पेपरनिहाय उपस्थीती पत्राकावर केलेल्या स्वाक्षरी पेक्षा भिन्न आहे. यावरुन स्पष्ट होते की, सुधीर अशोक खिरडकर यांचे सर्व पेपर डमी विदयार्थ्याने दिलेले आहेत.एलएलबी परीक्षेत स्वतःच्या नावाने बसवला डमी उमेदवार बसवल्या प्रकरणी त्यांच्या विरूद्ध जालना पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे
तुळजाभवानी इंग्लिश स्कूलचे शैक्षणिक कार्य कौतुकास्पद- आ.विजयसिंह पंडित तुळजाभवानी इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न गेवराई दि 24 (वार्ताहर) तुळजाभवानी...
परमेश्ववर सातपुते यांच्यावर पक्षाकडून मोठी कार्ययाई बीड दि15 ( वार्ताहार ) अखेर जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते यांची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आलेले...
सामान्य जनतेत काम करणाऱ्यांना पक्ष संघटनेत प्राधान्य देवू - अमरसिंह पंडित जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांच्या उपस्थितीत गेवराईत सदस्य नोंदणीचा शुभारंभ...