गेवराई दि २० ( वार्ताहार ) काजळा याठिकाणी घराच्या समोर दारात बसलेल्या एका ( ५० वर्षिय ) महिलेला जबर मारहाण करून तसेच तिच्या सुनेचा वाईट हेतूने हात धरून विनयभंग केला असल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी चार जणांविरूद्ध चकलांबा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
याबाबत सविस्तर माहिती अशी की , गावांतील चार आरोपी संगनमत करूण फिर्यादी यांच्या घरासमोर जाऊन तुमच्या घरातील लोक कुठे आहेत असे म्हणू लागले त्यावर फिर्यादीने असे सांगितले की आमच्या घरातील मंडळी बाहेरगावी गेली आहेत ते कशाला ईथे असतील तुम्ही त्यांच्यावर परत खोट्या केसेस करताल असे म्हणताच आरोपींनी हातातील काठ्याणी जबर मारहाण केली व घरात स्वयंपाक करत असलेल्या सुनेला वाईट हेतूने हात धरून मारहान केली व तुम्ही या ठिकाणी राहायचे नाही असे सांगून जिवेमारण्याची धमकीही दिली त्यांनंतर घरावर दगडफेक केली असल्याची तक्रार चकलांबा पोलिसांत फिर्यादीने दिली असुन या प्रकरणी उद्धव डोंगरे , अशोक डोंगरे , संभाजी डोंगरे , भाऊसाहेब डोंगरे , सर्व राहणार काजळा यांच्या विरूद्ध गून्हा दाखल करण्यात आला असुन या प्रकरणाचा पुढील तपास जमादार किशोर इंगोले हे करत आहेत .
तुळजाभवानी इंग्लिश स्कूलचे शैक्षणिक कार्य कौतुकास्पद- आ.विजयसिंह पंडित तुळजाभवानी इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न गेवराई दि 24 (वार्ताहर) तुळजाभवानी...
परमेश्ववर सातपुते यांच्यावर पक्षाकडून मोठी कार्ययाई बीड दि15 ( वार्ताहार ) अखेर जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते यांची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आलेले...
सामान्य जनतेत काम करणाऱ्यांना पक्ष संघटनेत प्राधान्य देवू - अमरसिंह पंडित जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांच्या उपस्थितीत गेवराईत सदस्य नोंदणीचा शुभारंभ...