पांचाळेश्वर, शनिमंदिर पाण्याखाली; गोदावरी पात्राला पुराचा धोका

गेवराई दि. १८ ( वार्ताहार ) : गोदावरी नदी पत्रामध्ये जायकवाडी धरणातून मोठ्यापर्णमानावर सोडण्यात येत आहे. शनिवारी दुपारी हा विसर्ग १ लाख क्यूसेसच्या पुढे पोहचला तसेच मार्गातील इतर ओढे, नाले यामधील पाणी देखील गोदावरी नदीत आल्यामुळे शनिवारी सायंकाळी गोदावरी नदीपात्रात सुमारे १ लाख ३० हजार क्यूसेस वेगाने पाणी वाहत आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यात गोदावरी पात्राला पुराचा धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने नदीपात्रातील लोकांना सावधगिरीचा इशारा दिला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की ,पैठणचे जायकवाडी धारण सध्या ९८ % भरले आहे. आणि जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रातून अजूनही पाण्याची धरणात होणारी आवक जास्त आहे. त्यामुळे गोदावरी पात्रात मोठ्याप्रमाणावर पाणी सोडण्यात आले आहे. जयकवाडीतून सोडण्यात येणारे पाणी आणि गोदावरी नदीत इतर ओढे, नाले यातून येणारे पाणी यामुळे सध्या गोदावरी दुथडी भरून वाहत आहे. काही ठिकाणी गोदावरीच्या धोक्याची पातळी ओलांडली आहे. 

पंचाळेश्वर येथील दत्त मंदिर, राक्षसभुवनचे शनी मंदिर पाण्याखाली आहे. तसेच हा विसर्ग आणखी वाढल्यास नदीकाठच्या काही गावांचा संपर्क तुटण्याची भीति व्यक्त होत आहे. प्रशासनाने सतर्कतेचा उपाय म्हणून गोदावरी नदीकाठच्या गावांना ईशारा दिला आहे. नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत नदीपात्रात उतरू नये तसेच आपली जनावरे नदीपात्रापासून दूर न्यावीत असे अवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *