मोठी कारवाई! महाराष्ट्रात जॉन्सन एन्ड जॉन्सन बेबी पावडरचा उत्पादन परवाना रद्द

मुबंई दि १७ ( वार्ताहार ) राज्यात अजूनही वेगवेगळ्या ठिकाणी जाँन्सन अँण्ड जाँन्सन कंपनीच्या पावडरची व्रिक्री केली जात होती. मात्र आता कंपनीच्या पावडर उत्पादनाचा परवानाच रद्द करण्यात आलाय. यामुळे कंपनीला आर्थिक नुकसानीची झळही सोसावी लागणार आहे. प्रसिद्ध जाँन्सन अँण्ड जाँन्सन कंपनीवर महाराष्ट्रात मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कंपनीच्या पावडर उत्पादनाचा परवाना रद्द करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की ,कायमस्परुपी या कंपनीच्या पावडरवर राज्यात बंदी घालण्यात आलीय. एडीए अर्थात अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA)ही कारवाई केली आहे त्यामुळे या कंपनीला मोठा दणका बसलाय. राज्यात अजूनही वेगवेगळ्या ठिकाणी जाँन्सन अँण्ड जाँन्सन कंपनीच्या पावडरची व्रिक्री केली जात होती. मात्र आता कंपनीच्या पावडर उत्पादनाचा परवानाच रद्द करण्यात आलाय. यामुळे कंपनीला आर्थिक नुकसानीची झळही सोसावी लागणार आहे. पण दिलासादायक बाब म्हणजे लहान मुलांसाठी पावडर बनवणाऱ्या या कंपनीपासून आता चिमुरडे सुरक्षित राहतील, असा विश्वास व्यक्त केला जातो आहे. या कंपनीच्या काही उत्पादनांमध्ये, प्रामुख्याने पावडरमध्ये संशयास्पद अंश आढळून आला होता. याआधीदेखील जाँन्सन अँण्ड जाँन्सन कंपनीच्या उत्पादनांबाबत एफडीएने शंका घेतली होती. मात्र आता तर थेट कंपनीच्या पावडर उत्पादनावरच महाराष्ट्रात बंदी घालण्यात आलीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *