विवाहित महिलेचा खून आत्महत्येचा केला बनाव;पोलिस अधीक्षक कार्यलयासमोर प्रेत ठेवल्या नंतर गुन्हा दाखल 


गेवराई .दि.१६ ( वार्ताहार ) तालुक्यातील कोळगाव येथील एका विवाहित महिलेचा खून करून तिने आत्महत्या केल्याचा बनाव सासरच्या मंडळीनी( दि.१५ रोजी ) केला होता. मात्र माहेरच्या मंडळीने आक्रमक भूमिका घेऊन पहाटे तीन वाजता मृतदेह जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर ठेवण्यात आला होता. पोलीसांनी नातेवाईकांची समजूत काढली व मृतदेहाचे शवविच्छेदन करण्याचे आदेशीत केले. त्यानुसार अंबाजोगाई येथे शवविच्छेदन करून ( दि.१६ रोजी ) चकलांबा पोलीस ठाण्यात पतीसह सासु-सासर्‍या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.तसेच सदरील घटना ही गेवराई तालुक्यातील कोळगाव याठिकाणी घडली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की , ( दि.१५ रोजी दुपारी १.३०) च्या दरम्यान प्रियंका भाऊसाहेब येडे (रा. कोळगाव, वय २८ वर्षे) या महिलेचा काल संशयास्पद मृत्यू झाला होता दरम्यान या विवाहितेने आत्महत्या केल्याचे सासरच्या वतीने सांगण्यात आले होते. मात्र माहेरच्या लोकांनी त्यावर विश्वास ठेवला नाही. आमच्या मुलीचा खून झाल्याचे सांगून खुनाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली होती. काल पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली त्यामुळे पहाटे तीन वाजता मृतदेह जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयसामोर ठेवण्यात आला होता. पोलिसांनी नातेवाईकांची समजूत काढून शवविच्छेदन अंबाजोगाईच्या रुग्णालयात करून गुन्हा दाखल करून घेऊ, असे आश्‍वासन दिले व अंबाजोगाई रुग्णालयात आज सकाळी शवविच्छेदन झाल्यानंतर आरोपी पतीसह सासु-सासर्‍याविरोधात खुनाचा गुन्हा चकलांबा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास चकलांबा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भास्कर नवले हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *