अत्याचार पीडितेने दिला गोंडस मुलाला जन्म दोघेही सुखरूप

 

बीड : दि १५ ( वार्ताहार ) जालना जिल्ह्यातील अंबड येथील एका अल्पवयीन मुलीवर बीड शहरातील कॉफी शॉपमध्ये आणून अत्याचार केला होता. यातही पीडिता गर्भवती राहिल्यानंतर दोघांविरोधात गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला होता. याच पीडितेची बुधवारी दुपारी दीड वाजता जिल्हा रुग्णालयात सुखरूप प्रसूती झाली सध्या महिला पोलीस व डॉक्टर तिची काळजी घेत असून, माता व बाळ दोघेही सुखरूप असल्याचे सांगण्यात आले.

या बाबत सविस्तर माहिती अशी की , अंबड येथील एक अल्पवयीन मुलगी चुलतीसोबत गेवराईला कपडे खरेदीसाठी आली होती. याच वेळी बीडमधील दोघांनी तिला शहरातील एका कॉफी शॉपमध्ये आणले. तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार ती गर्भवती राहिल्यानंतर उघड झाला. या प्रकरणी १५ दिवसांपूर्वी गेवराई ठाण्यात अत्याचार अॅट्रॉसिटीअंतर्गत दोघांविरोधात गुन्हाही दाखल झाला होता. त्यानंतर, पीडितेला बीडच्या स्वाधारगृहात ठेवण्यात आले आहे… ठेवण्यात आले. यावेळी ती साडेआठ महिन्यांची गर्भवती होती.

१२ सप्टेंबर रोजी तिला कळा सुरू झाल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. पूनम लोध व त्यांच्या टीमने तपासणी केली. नॉर्मल प्रसूती होण्यासाठी वाटही पाहिली, परंतू बाळाचे ठोके आणि वय आहेत.कमी असल्याने डॉ. लोध यांनी सिझर करण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे, बुधवारी दुपारी दीड वाजता स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. किरण शिंदे यांनी तिचे सिझर करून सुखरूप प्रसूती केली. तिने व अडीच किलोच्या मुलाला जन्म दिला, परंतु गुन्ह्यांची गंभीरता व सुरक्षेच्या अनुषंगाने बाळाला एसएनसीयूमध्ये सध्या डॉक्टर आणि महिला पोलीस तिची काळजी घेत असून, माता व बाळ दोघांचीही प्रकृती ठणठणीत असल्याचे सांगण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते तत्त्वशील कांबळे, बालहक्क समितीचे अध्यक्ष अशोक तांगडे हे पीडितेला मदत करून काळजीही घेत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *