April 19, 2025

एसपींचा दणका वादग्रस्त खताळ अखेर सेवेतून निलंबीत

माजलगाव ग्रामिण महिला पोलिसांचा केला होता विनयभंग

 

बीड, दि. १५ ( वार्ताहार ) : चुका करणाऱ्यांना कायद्यात माफी हीच मग तो पोलिस कर्मचारीही नसो. असाच एक प्रकार माजलगाव ग्रामीण ठाण्यातून समोर आला आहे. याठिकाणी असभ्य वर्तन करणाऱ्या आणि शिस्त मोडणाऱ्या पोलिस पती-पत्नीस एसपी नंदकुमार ठाकूर यांनी मोठा दणका दिला आहे. सोबतच्या शिस्त मोडणाऱ्या खाकीतील पती-पत्नीला एसपींनी दिला दणका सोबतच्या महिला कर्मचाऱ्याच्या मोबाईलवर मॅसेजवर मॅसेज करणे भोवले पोलिस कर्मचारी असलेल्या (पती-पत्नीवर गुन्हा दाखल तर एकाला केले थेट सेवेतून निलंबित ए एस पी कविता नेरकरांच्या अहवालावर एसपींची कारवाई केली आहे . महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या मोबाईलवर मॅसेजवर मॅसेज करणे त्या पोलिस कर्मचाऱ्यास आणि त्याच्या पोलिस कर्मचारी असलेल्या पत्नीस चांगलेच भोवले आहे. या दोघांवर थेट गुन्हा दाखल करून यापैकी पुरुष पोलिस कर्मचाऱ्याला सेवेतून थेट निलंबित करण्यात आले आहे. अप्पर पोलिस अधीक्षक कविता नेरकर ज्यांच्या अहवालावर पोलिस अधिक्षकांनी ही कारवाई केली आहे. हरिचंद्र बलभीम खताळ असे निलंबित करण्यात आलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, की हरिचंद्र खताळ, त्याची पोलिस कर्मचारी असलेली पत्नी आणि फिर्यादी महिला पोलिस कर्मचारी हे तिघेजण एकाच बॅचमधील आहेत. ते तिथेही पोलिस शिपाई म्हणून माजलगाव ग्रामीण ठाण्यात कर्तव्य बजावतात. मात्र मागच्या अनेक दिवसांपासून खताळ हा फिर्यादीस त्रास देत होता, विशेष म्हणजे त्या महिला पोलिस कर्मचाऱ्यां च्या असभ्यपणे मोबाईलवरही सातत्याने तो मॅसेज करत होता, याप्रकरणावरूनच हरिचंद्र खताळ याच्या पोलिस कर्मचारी असलेल्या पत्नीने फिर्यादीस दमदाटीही केली होती, यासंदर्भात फिर्यादी महिला पोलिस कर्मचाऱ्याने आधी आयपीएस रश्मीता राव आणि त्यानंतर अंबाजोगाईच्या अप्पर पोलिस अधीक्षक कविता नेरकर यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. या तक्रारीची तात्काळ दखल घेवून पोलिस कर्मचारी असलेल्या खताळ दाम्पत्यावर कविता नेरकर यांनी कलम ३५४ सह अन्य कलमान्वये माजलगाव ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल केला, नेरकर यांनी केलेल्या चौकशीत खताळ हा दोषी असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच दोषी असलेल्या याच खताळ नामक पोलिस कर्मचाऱ्याला एसपींनी सेवेतून थेट निलंबित केले आहे. चुका करणाऱ्यांना कायद्यात माफी नाहीच, मग तो पोलिस कर्मचारीही असो, हेच या कारवाईतून पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी खऱ्या अर्थाने दाखवून दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *