विश्वास ठेवून शिवसेनेत आलेल्या कार्यकर्त्यांना
कधीही वाऱ्यावर सोडणार नाही –  बदामराव पंडित

लुखामसल्यातील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

गेवराई दि १३ ( वार्ताहार ) गेवराई तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या 12 शिलेदारांनी राष्ट्रवादीला सोडचिट्टी आपल्या सहकाऱ्यांसह शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 13 सप्टेंबर 2022 रोजी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे हा रेवकी – देवकी आणि तलवाडा सर्कलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा हादरा असल्याचे बोलले जात आहे.

गेवराई तालुक्यात आपल्या सहज वृत्तीने काम करण्याच्या पद्धतीने लोकप्रिय झालेले शिवसेनेचे माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने वेगवेगळ्या राजकीय पक्ष आणि संघटनेचे कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत. दिनांक 13 सप्टेंबर रोजी लुखामसला येथील गौतम हुलगे, रामदास पौळ, सतीश गायकवाड, बाळू गिरी, गोविंद हुलगे, माजी सरपंच राजाभाऊ येळे, देविदास पौळ, सुरेश पौळ, भाऊसाहेब हूलगे, दशरथ पौळ, भानुदास पौळ, श्रावण पौळ या बारा शिलेदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिट्टी देऊन शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. सर्वांचे माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी गळ्यात भगवे रुमाल घालून स्वागत केले. यावेळी बोलताना बदामराव पंडित म्हणाले की , आपल्यावर विश्वास ठेवून शिवसेनेत आलेल्या एकाही शिवसैनिकाला कधीही वाऱ्यावर सोडणार नाही. कोणतीही अडचण आल्यास मला तात्काळ फोन करा अर्ध्या रात्री तुमच्या मदतीला दारात उभा असेल, असे सांगून येणाऱ्या काळात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेचाच भगवा फडकणार असल्याचा विश्वास आता तालुक्यातील जनताच देत आहे. विरोधकांनी विश्वासघात केल्याने विविध पक्ष आणि संघटनेचे कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत. सामान्य कुटुंबातील आणि शेतकरी पुत्रांना सत्तेत संधी देण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचेही यावेळी बदामराव पंडित म्हणाले.याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख बबलू खराडे, सरपंच अश्विनी कैलास भिसे, दिनकर काळे, ज्ञानोबा नलगे, बन्सी पौळ, नंदू पारेकर, बापूसाहेब काळे, मनोज डोमळे, गणेश शिंदे, सचिन काळे, सय्यद मुसाभाई, विठ्ठल व्हरकटे, जिजा काळे, संदीप भावले, सतीश देवकते, महादू शिंदे, भारत पौळ, राजाभाऊ कोकरे रामप्रसाद सरगर धनराज पवार कल्याण काळे बंडू निरपगार दीपक वाघमारे रामकिसन थोरात बंडू शिंदे शिवसैनिक व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *