गेवराई दि १२ ( वार्ताहार ) गणपती मिरवणूक काढली असतांना तालुक्यातील राजंणी या ठिकाणी दोन गटात तुफान हानामारी झाली होती या प्रकरणी एकाला तिश्न हत्याराने सपासप वार करूण जखमी केल्याबद्दल गेवराई पोलिसांत पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
या बाबत सविस्तर माहिती अशी की , तालुक्यातील राजंणी या ठिकाणी ( दि ६ रोजी ) विना परवाना गणपती ची मिरवणूक काढण्यात आली होती मिरवणूक गावांतून रोडवर आल्यानंतर या ठिकाणी दोन गटात तूफान राडा झाला यामध्ये योगेश बळीराम कदम ( वय २८ वर्ष ) ह्या युवकांवर सपासप तिश्न हत्याराने वार केले असल्याची फिर्याद वरील फिर्यदीने दाखल केली असुन यामध्ये , लखन ससाणे , मधूकर ससाणे , किशोर ससाणे , सनी ससाणे ,गणेश ससाणे , यांच्या विरूद्ध खुनाचा प्रयत्न करणे व अन्य कलामान्वे गून्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रफूल्ल साबळे करत आहेत .
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...