माझी इच्छा पूर्ण कर, नाहीतर फाशी घेईल म्हणत पोलिस कर्मचाऱ्याने केला सहकारी महिला पोलिस कर्मचाऱ्याचा विनयभंग

प्रकरण मिटवण्यासाठी पोलिस कर्मचाऱ्याची पत्नी असलेल्या महिला पोलिसांकडून पिडितेला धमकी; पोलिस पती-पत्नीवर गुन्हा दाखल

 

माजलगाव, दि १० ( वार्ताहार ) : सहकारी महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या घरी जाऊन व पोलीस ठाण्यात जवळीक करत ‘माझी इच्छा पूर्ण कर, नाहीतर मी फाशी घेईल. ‘असे धमकावत सतत अश्लील इशारे, व्हाट्स अपवर मेसेज पाठवून पोलीस कर्मचाऱ्याकडून महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग करण्यात आला. सदरील घटना ८ सप्टेंबर रोजी घडली. दरम्यान पैसे घेऊन प्रकरण मिटवून टाक म्हणत पोलीस कर्मचाऱ्यांची पत्नी पोलीस नाईकने पिढीतेस धनकावल्याने पीडित महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या फिर्यादीवरून पती-पत्नी पोलीस कर्मचाऱ्यांवर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेल्या माहितीवरून ग्रामीण पोलीस ठान्यात कर्तव्यावर असलेल्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला येथेच कार्यरत असणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्यांने २०२१ पासून ते २७ ऑगस्ट २०२२ पर्यंत सतत माझ्यासोबत जवळीक कर, माझी इच्छा पूर्ण कर असे म्हणत कर्तव्यावर असताना व्हाट्सअप मेसेज करून व अश्लील इशारे करून परेशान करण्यात येत होते. दरम्यान ८ सप्टेंबर २०२२ रोजी रात्री पावणेअकरा वाजताच्या दरम्यान पोलीस कर्मचाऱ्याने महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या घरी जाऊन माझी इच्छा पूर्ण कर नाहीतर मी फाशी घेईल असे धमकावत विनयभंग केला. दरम्यान पोलीस कर्मचाऱ्यांची पत्नी महिला पोलीस नाईकनेही पीडित महिला पोलीस कर्मचाऱ्यास पैसे घेऊन प्रकरण मिटवून टाक नाहीतर तुझ्यावर, तुझ्या नातेवाईकांवर ३०६ गुन्हा दाखल करून तुझी बदनामी करील, तुला कुठे तोंड दाखवायला जागा ठेवणार नाही, असे धमकावले. दरम्यान पीडित महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात आरोपी असलेल्या पोलिस पती-पत्नी विरुद्ध गु.र. २४८/२०२२ कलम ३५४ (अ) १, ३५४ (अ) १, ३५४ (ड) १, ४५२,५०६.३४ भादंवि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक धनंजय फराटे करत आहे. दरम्यान या घटनेने बीड पोलीस दलात चाललय काय? असा सवाल उपस्थित होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *