चोरी गेलेल्या दुचाकीचा आवघ्या दोन दिवसात छडा; डीबी पथकांची कामगिरी
गेवराई : दि ६ ( वार्ताहार ) शहरातील एका व्यक्तीची न्यायालयाच्या गेट च्या बाहेर लावलेली दुचाकी शुक्रवार रोजी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती. याची तक्रार गेवराई ठाण्यात दाखल करण्यात आली होती.याचा डि.बी पथकाने जलद गतीने छडा लावुन आवघ्या दोनच दिवसात चोरट्याला गाडी सह त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्या जवळुन अनखिन दुसरी दुचाकी जप्त करण्यात आली आहे.या कामगिरी बद्दल गाडी मालकाने डि.बी पथकाचा सत्कार करून पेढे खाऊ घातले.
शहरातील गजानन नगर येथील रहिवासी अक्षय पवार यांच्या मालकीची दुचाकी क्रमांक एम.एच २३ ए.एल २२३० शुक्रवार रोजी दुपारी येथील न्यायालयाच्या गेट बाहेरून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती.गाडी घेवुन जातांना चोरटा सी.सी टिव्ही मध्ये कैद झाला होता.या प्रकरणी गाडी मालक यांच्या फिर्यादी वरून गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.याचा तपास डि.बी पथकाचे प्रमुख सपोनि प्रफुल्ल साबळे यांनी जलद गतीने व आवघ्या दोनच दिवसात तपास करून आरोपी जावेद सत्तार पठाण वय २५ राहणार तय्यब नगर गेवराई हल्ली मुक्काम बार्शी नाका बीड यांच्या सोमवार रोजी डि.बी पथकाने बीड येथील बार्शी नाका येथुन गाडी सह मुसक्या आवळल्या असुन त्यांच्या कडुन आणखीन एक चोरीची दुचाकी जप्त करण्यात आली आहे.हि कारवाई डि.बी पथकाचे प्रमुख सपोनि प्रफुल्ल साबळे,कृष्णा जायभाय,नितीन राठोड,दिलीप सरोदे यांनी केल्या बद्दल त्यांचा गाडी मालक यांनी सत्कार करून पेढे खाऊ घातले.यावेळी पत्रकार सखाराम शिंदे,अक्षय पवार, मनोज शिंदे, मेघराज शिंदे, अमित वैद्य,अभिजित ठाकुर,जयसिंग माने,ऋषिकेश सिरसाट,सार्थक शिंदे, संग्राम शिंदे सह अनेक जण उपस्थित होते.
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...