गोंदी ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांने पोलिस खात्याची अब्रू वेशीला टांगली

बीड दि. ३ ( वार्ताहार ):- जालना जिल्ह्यातील गोंदी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक यापुर्वी बीड ग्रामीण ठाण्यात होते. इथे असतांना त्यांनी नेहमी धार्मिक वृत्तीचा आव आणत मी खूप सोज्वळ आहे असे दाखविण्याचा प्रयत्न केला. मात्र ठाण्यातीलच एका पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नी सोबत हे पीआय आक्षेपार्ह अवस्थेत आढळून आले. विशेष म्हणजे संबंधीत महिलेच्या पोलीस असलेल्या पतीनेच त्यांना रंगेहाथ पकडले. संबंधीत पोलीस कर्मचारी बोलत असल्याची एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने हा सर्व प्रकार समोर आला. स्वतःला खूप सोज्वळ दाखविण्याचा प्रयत्न करणाऱ्या पीआयने असे कृत्य करणे म्हणजे ‘मी नाही त्यातली अन् कडी लावा आतली’ असेच होय.पोलीस निरीक्षकांच्या या कारनाम्यामुळे पोलीस खात्याची अब्रू वेशीला टांगली गेली आहे .

याबाबत सविस्तर माहिती अशी की , बीड येथील ग्रामीण पोलीस ठाण्यात ड्युटी बजावल्यानंतर एका पीआयची जालना जिल्ह्यातील गोंदी येथील पोलीस ठाण्यात बदली झाली. त्या ठिकाणी त्या पीआयचा खरा चेहरा उघडकीस आल्याचे एका क्लिपवरून समोर आले. ८ मिनीटे ५२ सेकंदाच्या या ऑडिओ क्लिपमध्ये एक पी. आय. आणि पोलीस कर्मचाऱ्याचा संवाद होत आहे. कर्मचारी रडत रडत त्या पी. आय. ने धोका दिल्याचे म्हणत आहे. मी तुमच्यावर एवढा विश्वास ठेवला, तुम्हाला मी गुरु मानले आणि तुम्हीच माझा संसार उध्वस्त केला. तुम्ही मला समजून घेतले नाही असे तो कर्मचारी सांगत आहे. आज वरिष्ठअधिकाऱ्यांनी मला बोलाविले होते. त्यांना मी काय बोलू? तुम्ही सांगा सर ? असे तो पोलीस कर्मचारी बोलत आहे. त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्याने फेसबूक लाईव्ह करून घडलेल्या बाबी सांगितल्या. तो पोलीस कर्मचारी जालना येथे गेला होता. परंतु परतीच्या दिवसाच्या अगोदरच तेथून तो कोणालाही न सांगता रात्री उशिरा गोंदी यथील घरी आला. नेहमी प्रमाणे पाठिमागील बाजुने घरात प्रवेश केल्यानंतर दरवाजा उघडाच होता. आतमध्ये जाताच पी.आय. त्या कर्मचाऱ्याच्या पत्नी सोबत आक्षेपार्ह अवस्थेत आढळून आल्याचे स्वतः त्या कर्मचाऱ्याने सांगितले. याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणीही संबंधीत पोलीस कर्मचाऱ्याने केली आहे . तसेच आपल्या कर्तव्यावर काही पोलीस कर्मचारी नाराज आहेत यामुळे माझी बदनामी करणाच्या हा डाव आहे असा दावा गोंदी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शितलकूमार बल्लाळ यांनी केला आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *