January 23, 2025

डिजीटल मीडिया परिषदेची कार्यकारिणी जाहिर

गेवराई : दि २  ( वार्ताहार  )  अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख सर यांच्या आदेशानुसार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न डिजिटल मिडिया परिषदेच्या गेवराई तालुका अध्यक्ष पदी अविनाश इंगावले यांची निवड नुकतीच जाहीर करण्यात आली.त्यानंतर उर्वरित कार्यकारणी जाहीर करण्यात आली. तसेच आज एका बैठकीत अध्यक्ष यांनी उर्वरित कार्यकारिणी सर्वानुमते जाहिर केली आहे यामध्ये तालुका उपाध्यक्ष पदी सुभाष शिंदे, तालुका सचिव पदी सोमेश्वर वामनराव मोटे,ता.कार्यअध्यक्ष पदी शेख जावेद सर,ता.कोषाध्यक्ष पदी देवराज गणा कोळे, ता.संघटक पदी सुदर्शन देशपांडे, ता सोशल मीडिया प्रमुख पदी शेख अफरोज यांची सर्वानुमते निवडी तालुका अध्यक्ष अविनाश इंगावले जाहिर केली आहे नुतन पदाधिकारी यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख सर यांच्या आदेशानुसार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न डिजिटल मिडिया परिषदेच्या गेवराई तालुका कार्यकारिणी निवडी संदर्भात मराठी पत्रकार परिषदेचे राज्य कार्यकारिणी सदस्य अनिल वाघमारे यांच्या सुचनेनुसार डिजिटल मिडिया परिषदेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र सिरसाट यांनी नुकतीच गेवराई या ठिकाणी एक बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी परिषदेचे ध्येय, धोरणे, डिजिटल मिडियाचे कार्य काय असणार, ज्यांच्या निवडी केल्या जातील त्यांच्या जबाबदारी काय असणार, याची सांगोपांग माहिती देत त्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी सर्व सुचनांचे पालन करणे बंधनकारक करुन डिजिटल मिडिया परिषद गेवराई तालुका अध्यक्ष पदी अविनाश इंगावले यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. व त्यांची बिनविरोध निवडी जाहीर करण्यात आली. नवनिर्वाचित अध्यक्ष यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर लगेच ( आज दि २ रोजी ) बैठक घेऊन वरिल कार्यकारिणी जाहिर केली व डिजीटल मीडिया परिषदेचे तालुका सदस्य पदी समीर सौदागर,इम्रान सौदागर, ज्ञानेश्वर मुंडे,ज्ञानेश्वर हवाले, श्याम जाधव, शेख अफसर,सखाराम पोहिकार, अमोल भांगे, अमोल ढाकणे,गणेश ढाकणे यांची निवडी करण्यात आल्या आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *