लैंगिक अत्याचार प्रकरणात मोठा खुलासा पिडीत आठ महिन्याची गरोदर
गेवराई दि २ ( वार्ताहार ) गेल्या दोन दिवसांपुर्वी अपहरण करूण तिच्यावर बीड याठिकाणी एका कॉफीशॉप मध्ये बलात्कार केला असल्याची फिर्याद गेवराई पोलिसांंत दोन दिवसांपुर्वी दाखल करण्यात आली होती या प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या तसेच तपासांत यामध्ये मोठा खुलासा झाला आहे पिडीत अल्पवयीन मुलगी ही सात ते आठ महिन्याची गरोदर असल्याची धक्कादायक बाब समोर आली असल्याने या प्रकरणात आणखी आरोपी वाढण्याची शक्यता आहे .
या बाबत सविस्तर माहिती अशी की , आपल्या चुलती सोबत गेवराई याठिकाणी कपडे खरेदी करण्यासाठी आलेल्या एका ( १६ वर्षिय ) मुलगी हीचे दोन मुलांनी अपहरण करूण तिच्यावर बीड याठिकाणी असनाऱ्या एका कॉफीशॉप मध्ये तिच्यावर अत्याचार केला असल्याची माहिती पिडीतेने गेवराई पोलिसांना दिली तसेच या प्रकरणात दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत दोन्ही आरोपी सध्या पोलिस कोठडीत आहेत तसेच अंबड या तालक्यातून गेवराई तालुक्यात शेतात सालाने काम करण्यासाठी हे कुटूंब आले होते तसेच पिडीत ही अल्पवयीन आहे ती सात ते आठ महिन्याची गरोदर असल्याची बाब समोर आली असल्याने आता खळबळ उडाली आहे या प्रकरणात आणखी आरोपी वाढणार असल्याचे शक्यता नाकारता येत नाही या प्रकरणी कसुन तपास करूण योग्य ती कार्यवाई करू असे पोलिस उप अधीक्षक स्वप्निल राठोड यांनी सांगितले आहे .
संपादकाला धमकी वजा चितावनी देणाऱ्या आघाववर बडतर्फीची कार्यवाई करा गेवराई तहसिलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना सर्व पत्रकार संघाच्या वतिने निवेदन गेवराई...