बँक कर्मचाऱ्याला लुटणारे तिघे गजाआड;स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाई

गेवराई दि १ ( वार्ताहार ) महिला बचत गटांची वसुलीची ९५ हजारांची रक्कम घेऊन जाणाऱ्या बँक कर्मचाऱ्याची लूट केल्याच्या प्रकरणाचा छडा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी लावला. याप्रकरणी तीन जणांना गजाआड केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सतीश वाघ यांनी दिली.

पाचेगाव (ता. गेवराई) येथील सुदर्शन शिवाजी आघाव हे एका बँकेसाठी महिला बचत गटाच्या रकमेच्या वसुलीचे काम करतात. २६ ऑगस्ट रोजी सकाळी ते ९५ हजार ६१० रुपयांची रक्कम घेऊन बीडकडे येत असताना पाइळशिंगीजवळ त्यांची दुचाकी अडवून पैशांची बॅग काही जणांनी लंपास केली होती. याप्रकरणी गेवराई पोलिसांत गुन्हा नोंद केला होता. एसपी नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक सुनील लांजेवार यांनी स्थानिक गुन्हे शाखेला या गुन्ह्याच्या तपासाबाबत सूचना दिल्या होत्या. हा गुन्हा आनंद आघाव हा दर शुक्रवारी पैसे भरण्यासाठी बीडला जातो याची माहिती या तिघांना होती. त्यांनी दोन महिने रेकी करून ही लूट केली. यापूर्वीही त्यांनी एकदा प्रयत्न केला होता. मात्र, ऐनवेळी त्यांना प्लॅन बदलावा लागला होता, अशी माहिती समोर आली आहे.

सुंदर ससाणे (रा. पंचशीलनगर, बीड) याने साथीदारांसह केल्याची माहिती मिळाल्यावरून बुधवारी त्याला अटक केली. त्याचे साथीदार आकाश प्रकाश घुताडमल (रा. टाकळगाव, ता. गेवराई), अकील इस्माईल शेख (रा. आहेर वाहेगाव, ता. गेवराई) यांनाही गजाआड केले. उप निरीक्षक भगतसिंह दुल्लत यांच्यासह पोलिस कर्मचारी मनोज वाघ, रामदास तांदळे, विकास वाघमारे, सोमनाथ गायकवाड, प्रसाद कदम, विकी सुरवसे, अशोक कदम यांनी ही कारवाई केली.तसेच या तिन्ही आरोपीना गेवराई पोलिसांच्या स्वाधीन केले असुन आज त्यांना गेवराई न्यायलयात हजर करण्यात येईल .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *