सामान्यांचे प्रश्न पोटतिडकीने सोडविण्याचे काम अमरसिंहांनी केले – आ. अशोक पवार
शारदा प्रतिष्ठानच्या शिबीरात दिव्यांगांना मोफत कृत्रिम अवयवांचे वाटप
गेवराई दि. २८ ( वार्ताहार ) – अमरसिंह पंडित यांनी माणुसकीचा धर्म सांभाळत दिव्यांगांना मोठा आधार दिला आहे. शारदा प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी विविध समाजपयोगी उपक्रम राबवुन समाजहित जोपासले आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न पोटतिडकीने सोडविण्याचे काम अमरसिंह पंडित यांनी केले असे प्रतिपादन आ. अशोक पवार यांनी केले. शारदा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या मोफत कृत्रिम अवयव वाटपाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी २७१ दिव्यांगांना मोफत कृत्रिम हात व पायांचे वाटप करण्यात आले. व्यासपिठावर अमरसिंह पंडित, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड. राजेश्वर चव्हाण, विजयसिंह पंडित यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शारदा प्रतिष्ठान, गेवराई आणि साधू वासवाणी मिशन, पुणे यांच्या संंयुक्त विद्यमाने रविवार दि. २८ ऑगस्ट रोजी पात्र लाभार्थ्यांना अद्यावत तंत्रज्ञानाने तयार केलेले अत्यंत हलके व मजबुत फायबर पासुन निर्मित मोफत कृत्रिम हात व पाय या अवयवांचे मान्यवरांच्या शुभहस्ते वाटप करण्यात आले. कार्यक्रमालाा पुणे जिल्ह्यातील शिरुर-हवेली मतदार संघाचे आ. अशोक पवार, प्रतिष्ठानचे कार्यवाह अमरसिंह पंडित, राष्ट्रवादीचे बीड जिल्हाध्यक्ष अॅड. राजेश्वर चव्हाण, माजी जि.प.अध्यक्ष विजयसिंह पंडित, भवानी बँकेचे चेअरमन बप्पासाहेब मोटे, जि.प. सभापती बाबुराव जाधव, बाजार समितीचे सभापती जगन पाटील काळे, जयभवानीचे व्हा. चेअरमन जगन्नाथ शिंदे, साधु वासवाणी मिशनचे मिलींद जाधव, सुशिल ढगे, जि.प. सदस्य फुलचंद बोरकर, माजी सभापती पाटीलबा मस्के, किशोर कांडेकर, जालिंदर पिसाळ, सरवर पठाण आदी मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते. प्रातिनिधिक स्वरुपात अर्जुन जाधव यांना कृत्रिम पायाचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमात फय्याज पठाण या लाभार्थी दिव्यांगाने मनोगत व्यक्त करुन अमरसिंह पंडित यांचे आभार व्यक्त केले.