उद्या शासकीय ईतमामात होणार विनायक मेटे यांच्या पार्थिवावर अंत्यसंकार 

बीड दि १४ ( वार्ताहार )  रविवारी पहाटे मुंबईनजीक झालेल्या अपघातात शिवसंग्रामचे संस्थापक माजी आमदार विनायक मेटे यांचे निधन झाले . त्यांच्या पार्थिवावर सोमवारी (दि. १५ ) दुपारी बीड येथे अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीय सूत्रांनी दिली आहे.

विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाल्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे. दरम्यान मा आमदार विनायक मेटे यांचे पार्थिव आज सायंकाळी बीड येथे आणण्यात येणार आहे. येथील शिवसंग्राम भवनात हे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे. पार्थिवावर उद्या सोमवारी दुपारी बीड येथेच अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. दरम्यान प्रशासनाच्या वतीने अंत्यसंस्काराच्या जागेची पाहणी करण्यात आली आहे. विनायक मेटे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत अशी माहिती आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *