उपअधीक्षकांनी लक्ष घातल्याने चकलांबा पोलिस ठाणेदार भानावर
[ ज्ञानेश्वर हवाले ]
उमापुर दि ११ ( वार्ताहार ) तालुक्यातील हिवरवाडी या ठिकाणी गायरान जमिनीवर आपली उपजिवीका भागवणाऱ्या आदिवासी कुंटूबियातील एका महिलेला चकलांबा पोलिस ठाण्याच्या आवारात मारहाण करण्यात आली होती त्याचवेळी चकलांबा पोलिस प्रेक्षकांचा भूमिकेत थांबले होते. सदर महिलेने पोलिस अधीक्षक यांच्याकडे लेखी निवेदन देऊन कैफियात मांडली होती, या प्रकरणी गेवराईचे उप अधीक्षक यांनी लक्ष घातले व (दि १० रोजी ) रात्री उशीरा या प्रकरणी पाच जणांविरूद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा व विनयभंग व अन्यकलामान्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
या बाबत सविस्तर माहिती अशी की , किरकोळ कारणावरून गावांतील एका राजकीय पुढारी यांने गैरकायद्याची मंडळी जमा करून या महिलेला व तिच्या पतिला चकलांबा पोलिस ठाण्याच्या बोलायचे आहे असे सांगून पाच लोकांनी महिला व तीच्या पतीला जबर मारहाण केली व नको त्या ठिकाणी हात लाऊन महिलेचा विनयभंग केला त्यानंतर फिर्याद घेण्यासाठी चकलांबा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांना तक्रार नोंदवून घेण्यास विनंती केली परंतू त्यांची न घेता त्यांना हाकलून दिल्याची माहिती पिडीतेने दिली तसेच पोलिस अधीक्षक यांना या बाबत निवेदन सादर केले तसेच त्यानंतर या घटनेची माहिती प्रसार माध्यमाच्या माध्यमातून गेवराईचे उप अधीक्षक यांना मिळाली व त्यांनी या प्रकरणी लक्ष घातले व चकलांबा पोलिस निरीक्षकाला या बाबत तात्काळ कार्यवाई करण्याचे सांगितले त्यानंतर या महिलेच्या फिर्यादीवरूण आरोपी नामे सिकंद शेख, आक्तर सिकंदर शेख, सद्दाम सिकंदर शेख, मतिन पापा शेख, शकिल पापा शेख आणि पापा शेख यांच्या विरोधात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा व विनयभंग तसेच अन्यकलामान्वे चकलांबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास उपअधीक्षक सोप्नील राठोड करत आहेत .तसेच सदर प्रकरणात चकलांबा येथिल एका राजकीय पुढारी यांचे नाव गुन्ह्यातून वगळले असल्याची माहिती आहे .
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...